(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारून चाहत्यांच मनोरंजन करताना दिसत आहे. याचदरम्यान अभिनेता या आधी मलायका अरोरासोबत ब्रेकअपमुळे खूप चर्चेत होता. परंतु अर्जुन कपूर ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यान त्याने त्याच्या मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपवर खुलासा केला की तो आता सिंगल आहे. या प्रकरणे नंतर आता अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला असून, अर्जुन कपूरने स्वतःच्या पाठीवर एक नवा टॅटू काढला आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
अर्जुन कपूर काढला नवा टॅटू
नवीन वर्ष सुरु होण्यासाठी एकाच महिना बाकी राहिला आहे. आणि याच दरम्यान बॉलीवूड स्टार अर्जुन कपूर नवीन वर्षाची जोरदार करणार असे वाटत आहे. कारण अभिनेत्याने नवीन टॅटू बनवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अभिनेत्याने शेअर केला आहे. या टॅटूमुळे अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या टॅटू वर चाहत्यांसह अनेक सेलेब्रिटींनीही प्रतिसाद दिला आहे. अभिनेत्याने हा टॅटू पाठीवर काढला असून, हा टॅटू ‘रब राखा’ या नावाने बनवला आहे.
काय आहे या टॅटूचा अर्थ?
अभिनेत्याने ही पोस्ट शेअर करताना सुंदर कॅप्शन आणि या टॅटूचा अर्थ देखील स्पष्ट केला आहे. अभिनेत्याने लिहिले की, ‘देव तुझ्या पाठीशी आहे’. माझी आई नेहमी असे म्हणायची – चांगल्या आणि वाईट काळात. आजही असं वाटतं की ती माझ्यासोबतच आहे, मला मार्गदर्शन करत आहे, माझ्यावर लक्ष ठेवत आहे ‘सिंघम अगेन’ रिलीज होण्याच्या पूर्वसंध्येला मला हा टॅटू मिळाला आणि आता, मी या नवीन अध्यायाच्या उंबरठ्यावर उभा असताना, मला असे वाटते की तिने माझी पाठ थोपटली आहे, आणि विश्वाची एक योजना आहे याची आठवण करून दिली आहे. आई, मला शिकवल्याबद्दल धन्यवाद. रब राखा, नेहमी.’ असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
‘सिंघम अगेन’साठी रोहित शेट्टीने घेतली मोठी रिस्क, अर्जुन कपूर ठरला चित्रपट फ्लॉप होण्यामागचं कारण?
तसेच अभिनेत्याने काढलेल्या या टॅटूचा ‘देव नेहमी आपल्या पाठीशी असतो असा आहे.’ या टॅटूमुळे अभिनेत्याला नेहमी असे वाटेल की त्याची आई त्याच्या सोबत आहे आणि त्याला नेहमी आशीर्वाद देत आहे. अभिनेता या नवीन वर्षी नवीन अध्याय सुरु करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कामाच्या आघाडीवर, अर्जुन कपूर नुकताच सिंघम अगेन चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे, हा चित्रपट दिवाळीत १ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला असून, अजूनही हा चित्रपट सिनेमागृहात धमाका घालत आहे. तसेच अभिनेत्याचे अबेक चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून, तो लवकरच या आगम प्रोजेक्टचो घोषणा करणार आहे.