(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे सौंदर्य आणि ग्लॅमरस व्यक्तिमत्व नेहमीच चर्चेचा विषय असतो. ती आणि पती अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून जोरदार सुरु आहेत. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये घटस्फोटाबाबत पुन्हा नवे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊयात.
ऐश्वर्याच्या नावावरून बच्चन आडनाव काढून टाकले
दुबईत आयोजित ग्लोबल वुमेन्स फोरममध्ये सहभागी होण्यासाठी ही अभिनेत्री आली होती, मात्र या कार्यक्रमात असे काही घडले ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचे वातावरण निर्माण झाले. ऐश्वर्या रायच्या नावामधून ‘बच्चन’ हे आडनाव गायब होते, जे लोकांसाठी आश्चर्यकारक होते. आता प्रश्न निर्माण होऊ लागला आहे की असे का झाले? हा निव्वळ योगायोग होता की त्यामागे आणखी काही कारण असू शकते?
अभिषेक बच्चनचा दमदार अभिनय असूनही ‘I Want To Talk’ झाला फ्लॉप? जाणून घ्या कारण!
या कार्यक्रमादरम्यान, ऐश्वर्या रायचे नाव पडद्यामागे फक्त ‘ऐश्वर्या राय’ असे दाखवण्यात आले होते, तर सहसा तिच्या नावासोबत ‘बच्चन’ हे आडनाव जोडले जाते. ही बातमी सोशल मीडियावर झपाट्याने पसरली आणि यूजर्सनी यावर आपलं मत व्यक्त करायला सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, ‘शेवटी तिच्या नावातून ‘बी’ हा शब्द गायब झाला आहे, तर काही इतर यूजर्सनेही ऐश्वर्याच्या सौंदर्याचे कौतुक केले.
Most Beautiful lady in the world.
#AishwaryaRai at the global women’s forum in Dubai. ❤️😊#AishwaryaRaiBachchan #CWFD2024 #Bollywood pic.twitter.com/ZtbYKs4tLt— सुशील दुबे भारद्वाज (@SushilKrDubey97) November 28, 2024
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
अलीकडेच सोशल मीडियावर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात काही समस्या असल्याच्या अफवा पसरल्या होत्या आणि त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, या प्रकरणी बच्चन कुटुंबीयांकडून किंवा ऐश्वर्या रायकडून अद्याप कोणतेही स्पष्ट वक्तव्य आलेले नाही. आपल्या ब्लॉगद्वारे लोकांना सल्ला देताना अमिताभ बच्चन यांनी सत्य न तपासता बातम्या पसरवणाऱ्यांवर टीका केली होती. असे असूनही ऐश्वर्या आणि अभिषेकच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा सुरू असून सोशल मीडियावर हा विषय सातत्याने चर्चेत आहे. आता दुबईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऐश्वर्या राय-अभिषेक एकत्र दिसले नव्हते
ऐश्वर्या राय अलीकडे अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये दिसली आहे, मात्र तिच्यासोबत अभिषेकची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली आहे. या सगळ्या घटनांदरम्यान ऐश्वर्याच्या नावातून बच्चन हे आडनाव गायब झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की हा वैयक्तिक निर्णय असू शकतो, तर काही लोक याचा संबंध कुटुंबात सुरू असलेल्या वादाशी जोडत आहेत.