(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जय भानुशाली आणि माही विज हे टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. हे दोघं सध्या त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. असा दावा करण्यात येतोय की दोघांचा घटस्फोट झाला आहे, ज्यामुळे जय आणि माहीचे चाहते खूप नाराज झाले आहेत. मात्र अद्याप जय किंवा माही यांनी या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. चाहते त्यांच्या प्रतिसादाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चर्चांदरम्यान जय भानुशालीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून चाहते थोडेसे चकित झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच थोडा गोंधळ वाटला आहे.
जय भानुशाली याने त्याच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या गोंडस मुलगी तारा सोबत वेळ घालवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये जय आणि तारा दोघेही घरात धमाल करताना दिसत आहेत. तारा एका कपाटावर चढून डान्स करताना दिसते, तर जय कॅमेऱ्याकडे बघत मजेदार प्रतिक्रिया देताना दिसतो.या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये जयने लिहिले आहे, “जेव्हा बाबा मुलासोबत एकटे असतात, तेव्हा असं होणं अगदी स्वाभाविक आहे.”या पोस्टवर माही विज हिने कमेंट केली आहे, ज्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. माहीने कमेंटमध्ये लिहिले आहे, “तारा सर्वात क्यूट आहे.”

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
सोशल मीडियावर जयची ही पोस्ट आणि माहीची कमेंट प्रचंड व्हायरल झाली आहे. हे पाहून काही चाहते म्हणत आहेत की कदाचित दोघांमधलं सगळं ठीक आहे, तर काहींना मात्र माहीने फक्त ताराबद्दल कमेंट केली आहे असं म्हटलं आहे.
माही विजची कामाची कारकीर्द
नऊ वर्षांनंतर ही अभिनेत्री टेलिव्हिजनवर तिचे भव्य पुनरागमन करण्यास सज्ज आहे. माही आगामी टीव्ही शो “सहर होने का है” मध्ये पार्थ समथानसोबत स्क्रीन शेअर करेल. ती सध्या लखनऊमध्ये या शोचे शूटिंग करत आहे. “लागी तुझसे लगन” मध्ये नकुशा आणि “बालिका वधू” मध्ये नंदिनी या भूमिकांमुळे माहीला लोकप्रियता मिळाली. तिने नच बलिये ५, झलक दिखला जा ४ आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ७ यासह अनेक रिॲलिटी शोमध्येही काम केले आहे.






