फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस १८ : सोशल मीडियावर चर्चेत असलेला शो बिग बॉस १८ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. कालच्या भागामध्ये सारा अरफिन खान, इशा सिंह, अविनाश मिश्रा यांच्यामध्ये राडा पाहायला मिळाला. बिग बॉसने करणवीर मेहरा, रजत दलाल, सारा अरफीन खान, चाहत पांडे, दिग्विजय सिंह राठी आणि श्रुतिका अर्जुन यांना ‘टाइम गॉड’चा टास्क दिले होते. विवियन डिसेना यांना संचालक बनवण्यात आले होते. विवियनने साराला टास्कमधून बाहेर काढताच साराचा राग मस्तकात गेला आणि तिने तिचे रुद्र रूप दाखवले. साराने केवळ विवियनलाच नाही तर तिच्या मित्रांनाही फटकारले. यादरम्यान अरफीन खानने साराला समजवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी विवियन, अविनाश, ईशा आणि एलिसला टार्गेट करायला सुरुवात केली.
हेदेखील वाचा – Bigg Boss : एकता कपूर रजत दलालवर संतापली, म्हणाली माझ्या वडिलांचे नाव घेतले असते तर…
त्यानंतर साराने फक्त घरच्यांनाच नाही तर बिग बॉसच्या मेकरला सुद्धा सुनावले आहे. तिने मेकरला सांगितले की तुम्ही आमच्यासोबत पक्षपात करत आहेत आमच्याबरोबर अन्याय करत आहेत. आम्ही सुद्धा आमच्या मुलाबाळांना सोडून इकडे आलो आहोत आणि तुम्ही आमच्यासोबत अन्याय करत आहेत. साराला खरं तर मानसिक त्रास झाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर सारा खूप रागावते आणि बेडरूममध्ये जाते आणि ओरडायला लागते आणि बेडशीट आणि उशी फेकते. घरातील बाकीचे सोबती विशेषतः शिल्पा शिरोडकर आणि चुम दरंग तिला रोखण्याचा प्रयत्न करतात. पण तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यानंतर ती बऱ्याच टिपणी एलिस कौशिक, इशा सिंह आणि अविनाश मिश्रा यांच्यावर करत असते.
या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरामधून बाहेर जाण्यासाठी चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये सारा अरफिन खान, तिजेंदर बग्गा, अरफिन खान आणि चाहत पांडे या सदस्यांवर नॉमिनेशनच संकट आहे. आता घराबाहेर झालेल्या सदस्यांचे नाव समोर आले आहे. पाचव्या आठवड्यामध्ये घराबाहेर झालेला सदस्य म्हणजेच अरफिन खान. सारा अरफिन खानचा पत्नी या आठवड्यामध्ये घराबाहेर झाला आहे. मागील आठवड्यामध्ये दोन नव्या सदस्यांनी घरामध्ये एंट्री केली आहे. त्यामुळे घरामधील अनेक नाती खराब झाली आहे, तर काही नवी नाती पाहायला मिळत आहे.
Ekta Kapoor ne gharwaalon ko samjhaaya difference between “equality and special treatment”. If you agree with her statement, toh comments mein thumbs up dete jaaiye.
Dekhiye #BiggBoss18 Weekend Ka Vaar, Friday raat 9:30 baje aur Saturday raat 10 baje, sirf #colorstv aur… pic.twitter.com/GjErVDfMTB
— ColorsTV (@ColorsTV) November 8, 2024
आजच्या शुक्रवारच्या वॉरमध्ये दिग्दर्शक आणि निर्माती एकता कपूर आज येणार आहे. आजच्या भागामध्ये ती कोणत्या कोणत्या सदस्यांवर निशाणा साधणार आहे हे पाहणं मनोरंजक ठरेल. काही सोशल मीडियावर प्रोमो प्रदर्शित झाले आहेत त्यामध्ये तिने विवियन डिसेना, चाहत पांडे आणि रजत दलाल यांच्यावर निशाणा साधल्याचे स्पष्ट पाहायला मिळत आहे. तर शनिवारीच्या भागामध्ये रोहित शेट्टी शोमध्ये येणार आहे. या आठवड्यामध्ये सलमान नसणार आहे.