(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
बॉलिवूड स्टार्सची लाईफस्टाइल किती आलिशान आणि ग्लॅमरस आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. सुट्ट्यांसाठी परदेश दौरे, महागडे डिझायनर कपडे, लक्झरी गाड्या आणि बंगले सगळंच अफाट आहे. पण कधी विचार केला आहे का, शाहरुख खान, सलमान खान यांसारखे आपले आवडते स्टार्स एका महिन्यात किती कमावतात? या बद्दलच कॉमेडियन कृष्णाने अमिताभ बच्चन यांना प्रश्न विचारला आहे.
अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती १७’ सध्या जोरदार चर्चेत आहे. या शोमुळे अनेक सामान्य लोकांनी आपलं आयुष्य बदललं आहे आणि कोट्यधीश बनले आहेत. अलीकडेच ‘कांतारा’ चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेता ऋषभ शेट्टी शोमध्ये स्पेशल गेस्ट म्हणून आले होते.अलिकडेच नवीन भागात‘कौन बनेगा करोडपती 17’ च्या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये कॉमेडियन कृष्णा अभिषेक खास पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी कार्यक्रमात धमाल आणलीच, पण त्याच वेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांना थेट त्यांच्या कमाईबद्दल प्रश्न विचारला.
केबीसीच्या दिवाळी स्पेशल भागात कॉमेडियन कृष्णा अभिषेकने धमाल उडवून दिली. आपल्या खास शैलीत तो धर्मेंद्र यांची नक्कल करत सेटवर आला आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत मजेदार गप्पा मारल्या.सोनी टीव्हीने नुकताच ‘कौन बनेगा करोडपती १७’चा एक धमाल प्रोमो रिलीज केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये केबीसीच्या सेटवर हास्याने भरलेलं वातावरण दिसतं.
प्रोमोमध्ये सुनील ग्रोव्हर पूर्णपणे अमिताभ बच्चन यांच्या केबीसी गेटअपमध्ये दिसत आहे सूट, चष्मा आणि त्यांचा खास अंदाज अगदी हुबेहुब कॉपी केलेला आहे. त्याची ही एंट्री पाहून प्रेक्षकांबरोबरच बिग बींनाही हसू आवरत नाही.दुसऱ्या प्रोमोमध्ये सुनीलने पांढरा सूट घातलेला आहे, क्लीन शेव्ह केलेली आहे आणि तो त्याच्या खास विनोदी स्टाईलमध्ये ‘मेरे हसबंड मुझको प्यार नहीं करते’ हे गाणं गातो. त्याचा अंदाज इतका मजेदार असतो की अमिताभ बच्चन स्वतःही जोरात हसायला लागतात.
कृष्णा अभिषेक ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या वेशभूषेत आला. तो अमिताभ बच्चन यांना म्हणाला, “तुम्ही या गेटअपमध्ये चांगले दिसता. तुम्हाला यासाठी किती पैसे दिले आहेत. तुम्ही किती पैसे घेता?” असे त्याने विचारले. कृष्णा सुनीलबद्दल विनोद करण्यापासून मागे हटला नाही. तो म्हणाला, “येथे मी त्याला भाऊ म्हणतो, नाही तर, आमच्या शोमध्ये आम्ही दर आठवड्याला बहिणी आहोत.” हे ऐकून बिग बी हसू लागले.