फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू : ‘बिग बॉस 18’ आता फिनालेच्या अगदी जवळ आहे. अशा परिस्थितीत ‘बिग बॉस’चे सदस्य पूर्ण मेहनत घेत आहेत. एकीकडे विवियन डिसेनापासून चुम दारंगपर्यंत प्रत्येक सदस्य घरामध्ये राहून ‘बिग बॉस १८’ चे विजेतेपद मिळवण्यासाठी धडपडत आहे. दुसरीकडे, त्याचे चाहते त्याला बाहेरून पाठिंबा देत आहेत. आगामी भागामध्ये काही बिग बॉसच्या चाहत्यांना बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री मिळणार आहे यावेळी बिग बॉस चाहत्यांना नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी एक सदस्यांना घराबाहेर काढण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये श्रुतिका अर्जुन घराबाहेर झाली आहे. बिग बॉस १८ जेव्हापासून सुरु झाला आहे यामध्ये अनेक घरातल्या स्पर्धकांना बाहेरून त्यांच्या मित्रपरिवाराकडून समर्थन मिळत आहे.
Bigg Boss 18 : बिग बॉसमध्ये पहिल्यांदाच स्पर्धकांनी नाकारलं फिनालेचं तिकीट, वाचा सविस्तर
अभिनेता विवियन डिसेनाला टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील काही कलाकार त्याला समर्थन देत आहेत तर करणवीर मेहराचा खेळ पाहून त्याचा टेलिव्हिजनवरचा मित्र परिवार त्याचबरोबर चाहते त्याला भरपूर प्रतिसाद देत आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये आता खेळ आहे, आता फिनालेला फक्त एक आठवडा शिल्लक राहिला आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री चुम दारंग यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून चुमचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले, “अरुणाचल प्रदेशची मुलगी पासीघाटची चुम दारंग ही रिॲलिटी शो ‘बिग बॉस १८’ च्या टॉप-८ मध्ये पोहोचली आहे हे जाणून आनंद झाला. त्यांना तुमचा पाठिंबा द्या आणि मतदान करायला विसरू नका. मला आशा आहे की ती एक विजेती म्हणून उदयास येईल आणि पुढील वर्षांमध्ये आणखी अनेक टप्पे गाठेल. चुम दरंगला माझ्या शुभेच्छा.”
Chief Minister of Arunachal Pradesh, Pema Khandu extended his support to Chum Darang for Bigg Boss 18. pic.twitter.com/MYX7x8jhcw
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) January 10, 2025
‘बिग बॉस १८’ चा फिनाले १९ जानेवारीला प्रसारित होणार आहे. सध्या, बिग बॉसच्या घरात आठ सदस्य आहेत – विवियन डिसेना, अविनाश मिश्रा, ईशा सिंग, रजत दलाल, चाहत पांडे, करण वीर मेहरा, चुम दरंग आणि शिल्पा शिरोडकर. श्रुतिका अर्जुनला आठवड्याच्या मध्यावर बेदखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आता घरामध्ये श्रुतिका अर्जुनच्या इव्हिक्शननंतर आता घरामध्ये ८ सदस्य शिल्लक आहेत. टॉप ८ मध्ये करणवीर मेहरा, विवियन डिसेना, शिल्पा शिरोडकर, चुम दारंग, अविनाश मिश्रा, इशा सिंह, चाहत पांडे आणि रजत दलाल हे सदस्य अजूनही घरामध्ये फिनालेच्या शर्यतीत टिकून आहेत. या आठवड्यामध्ये चाहत पांडे आणि रजत दलाल हे अजूनही नॉमिनेट आहेत त्यामुळे या दोघांमधील घराबाहेर कोण जाणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.