फोटो सौजन्य - Jio Cinema
बिग बॉस 18 तिकीय टू फिनाले : बिग बॉस १८ च्या फिनालेला फक्त ९ दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे आता घरातले सदस्य फिनालेमध्ये जाण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. कालच्या भागामध्ये दाखवण्यात आले की, चुम दारंग आणि विवियन डिसेना यांनी ‘ बिग बॉस १८’ मध्ये फिनालेच्या तिकीटाच्या शर्यतीत आपले सर्वस्व केले. दोघांनीही फिनालेची तिकिटे मिळवण्यासाठी प्रत्येक युक्ती वापरली आणि कोणाचीही पर्वा न करता ते काम चोखपणे पूर्ण केले. असे असूनही आता शोमध्ये असा ट्विस्ट आला आहे, जो प्रेक्षकांनाही आश्चर्यचकित केला. आता सर्व मर्यादा ओलांडून अंतिम फेरी गाठल्यानंतर दोघांनीही फिनालेचे तिकीट नाकारले आहे.
ब्रिक्सचा टास्क विवियन डिसेनाने कालच्या भागामध्ये दाखवण्यात आले की जिंकला आहे. अंतिम फेरीचे तिकीट मिळविण्यासाठी त्याने खूप धडपड केली, त्याचबरोबर त्याचे नवे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळाले. एवढेच नव्हे तर त्याने टास्क त्याच्या पूर्ण अग्रेशनने खेळला. त्यानंतर रजत दलाल टास्कचा संचालक होता आणि त्याने विवियनला विजयी घोषित केले. परंतु जिंकल्यानंतर त्याने फिनाले तिकीट ठेवण्यास नकार दिला. इतकेच नाही तर विवियनला फिनालेचे तिकीट मिळवण्यात अपयश आल्यानंतर बिग बॉसने दुसऱ्या स्पर्धकाला म्हणजेच चुमला ऑफर दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विवियनप्रमाणेच चुम दारंगनेही फिनालेचे तिकीट स्वीकारण्यास नकार दिला. म्हणजेच या दोघांनी बिग बॉसमधून मिळालेल्या सुवर्ण संधीला लाथ मारली.
Bigg Boss 18 : विवियन डिसेनाने चुमची मागितलेली माफी पडली महागात! अविनाश-इशासोबतच्या नात्यात दुरावा
चुमला टास्कमध्ये गंभीर दुखापत झाली आहे, एवढेच नवे तर तीच्या डोक्याला त्याचबरोबर हातांना आणि पायाला बराच मार देखील लागला होता. एकावेळी तिला विवियनने जमिनीवरून फरफटत नेले. त्यामुळे विवियनने फिनालेचे तिकीट टाळले असावे. खरं तर, विवियन ज्या पद्धतीने टास्क खेळला त्यामुळे चुमला दुखापत झाली आणि विवियनला नॅशनल टीव्हीवर खूप वाईट दिसला यामुळे प्रेक्षकांनी त्याला ट्रोल देखील केले. अशा परिस्थितीत त्यांनी हे तिकीट स्वीकारले असते तर तो अंतिम फेरीत पोहोचले असते, पण जनतेच्या डोळ्यात अंजन पडले असते. त्याने त्याची चूक सुधारण्यासाठी फिनाले आठवड्याचे तिकीट नाकारले आणि चूक सुधारली.
त्यानंतर चुमने एवढी मोठी संधी वाया घालवली कारण तिचे म्हणणे होते की मला तिकीट हवे आहे पण स्वतःच्या कमाईने. पण दोघांनीही हा निर्णय घेऊन इतिहास रचला आहे कारण आजपर्यंत असे कधीच घडले नाही की कोणी फिनालेचे तिकीट नाकारले असेल. अशा स्थितीत निर्मातेही संतापले आहेत. आता या वीकेंडला सलमान खानही या दोघांसाठी क्लास घेऊ शकतात.