फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 : बिग बॉस 18 चा शेवटचा आठवडा सुरू आहे. सध्या घरामध्ये ७ सदस्य आहेत यामधील सहा सदस्य फिनालेमध्ये जाणार आहेत. शिल्पा शिरोडकरच्या हकालपट्टीनंतर टॉप ६ स्पर्धक एकमेकांना टक्कर देत आहेत. बाहेर काढण्यात येणारा पुढचा कोण असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक आहेत.फिनालेसाठी सर्वच स्पर्धक आणि प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. बिग बॉस १८ विजेता कोण होणार याची सर्वानाच उत्सुकता लागली आहे. कालच्या भागामध्ये मीडिया घरामध्ये आली होती यावेळी घरातल्या सदस्य मीडियाने खोचक प्रश्न विचारून त्यांना आरसा दाखवला आहे. यामध्ये शोमध्ये सलमान खान विकेंडच्या वॉरला येतो आणि ज्यांची चुकी असेल त्यांची शाळा घेत असतो.
Bigg Boss 18 : आईचे पत्र वाचताना करणवीर मेहरा झाला भावूक, अश्रू झाले अनावर
परंतु यावेळी बऱ्याचवेळा प्रेक्षकांना विवियन डिसेना, अविनाश मिश्रा आणि इशा सिंह यांच्याकडे बिग बॉसचे मेकर्स झुकलेले दिसले. यावेळी बऱ्याचदा इशा सिंह, अविनाश आणि विवियन यांनी घरातल्या सदस्याला त्याच्या मागे बऱ्याच टीका टिपणी केल्या आहेत परंतु त्यांना कधीही यावरून बोलण्यात आले नाही. आता विशेष म्हणजे बिग बॉसची लाडकी ईशाने टॉप ६ मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे पण आता ती चिंतेत आहे. ईशा टॉप ५ मधून बाहेर पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे पण मीडियाच्या पत्रकार परिषदेत तिचा खेळ ज्या प्रकारे उघड झाला, लाडलीला भीती वाटते की लोक तिच्यावर टोमॅटो फेकायला लागतील.
बिग बॉस १८ च्या ताज्या एपिसोडमध्ये, सर्व घरातील सदस्यांसह एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान, घरातील सदस्यांच्या खेळाशी आणि व्यक्तिमत्त्वाशी संबंधित अनेक प्रश्नोत्तरे झाली. इशा सिंग आणि अविनाश मिश्रा यांचा खेळ उघड केल्याचे आणि त्यांनी केलेल्या टीका टिपणी यांच्यासंदर्भात घरातल्या सदस्यांसमोर उघड केले आहे. मीडियाने तर ईशा कलर्स अभिनेत्री म्हणून शोमध्ये आल्याचे सांगितले. ती टीव्हीवर अगदी आधुनिक दिसते पण तिच्या खेळानुसार ती एखाद्या व्हॅम्पपेक्षा कमी दिसत नाही.
Eisha to Avinash Mishra : log Alice ke jane ka blame mujhe kyu dete hain 👀 #BiggBoss18 #Livefeed #BiggBoss pic.twitter.com/RErQiy8ng8
— BiggBoss24x7 (@BB24x7_) January 14, 2025
अर्थात, बिग बॉस १८ मध्ये, ईशा सिंग इतर घरातील सहकाऱ्यांबद्दल खूप चुगल्या करताना दिसली आहे. चाहत्यांनी तिला चुगली गँग लीडर आणि चुगली आंटी असेही टॅग केले. ईशाने करणवीर मेहराविरुद्ध खूप विष उकलले. चाहत पांडे आणि अरफीन खान यांच्या बाँडवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे केवळ गॉसिप आणि अविनाश मिश्रा यांच्यामुळे ईशा फिनाले वीकमध्ये पोहोचली. त्याने घरातील फक्त अशा लोकांशी संपर्क साधला जे फिनालेचे प्रबळ दावेदार आहेत.
एकूणच मीडियाने ईशा सिंगचा दुहेरी खेळ चाहत्यांसमोर उघड केला. शोच्या ताज्या एपिसोडमध्ये असे दाखवण्यात आले की, जेव्हा ईशा आणि अविनाश प्रेस कॉन्फरन्सनंतर बोलत आहेत, तेव्हा ईशा म्हणते की मीडियाने तिच्यावर सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले आहेत. तो व्हॅम्प असल्याचे दाखवले आहे.
अविनाश मिश्रा यांच्याशी संवाद साधताना ईशा पुढे म्हणते, ‘पत्रकार परिषदेत मला ज्या प्रकारे खलनायक बनवण्यात आले आहे, त्यामुळे बाहेर गेल्यावर माझ्यावर टोमॅटो फेकले जातील अशी भीती वाटते.’ हे ऐकून अविनाश म्हणतो की असे काही होणार नाही. ईशा पुढे म्हणते की ती वाईट व्यक्ती आहे असे तिला वाटत नाही.