फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया
बिग बॉस १८ नवा प्रोमो : बिग बॉसचे चाहते १९ जानेवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत. रविवारी चाहत्यांना बिग बॉसच्या विजेत्याचे नाव कळेल. घराघरात मीडिया फेरी झाली आणि आता घरातील सदस्य टॉप ५ ची वाट पाहत आहेत. आजच्या १५ जानेवारीच्या एपिसोडमध्ये बिग बॉसला टॉप ६ मिळू शकतात. चित्रपट दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर ओमंग कुमार आज घरी येणार आहे. तो घरातून बाहेर पडल्यावर घरातील सदस्याला सोबत घेऊन जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, आता शिल्पा शिरोडकर टॉप ६ च्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. ओमंग कुमार सदस्यांच्या कुटुंबियांची पत्रे घेऊन येणार आहेत.
Bigg Boss 18 : करणवीरसोबत नात्याच्या प्रश्नावर चुम काय म्हणाली? भांडणाच्या मुद्दयांवर केलं स्पष्ट
शोचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये ईशा करणच्या आईचे पत्र वाचून भावूक झालेला दिसला. त्याचवेळी त्याच्या आईचे एक पत्र करणवीर मेहरापर्यंत पोहोचणार आहे. करणवीर मेहरा आपल्या आईचे पत्र वाचून भारावून जाईल आणि खूप भावूक होणार आहे. ओमंग कुमार घरातील सदस्यांना त्यांच्या आवडत्या ठिकाणी घेऊन जातील आणि तेथे त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची पत्रे देणार आहे. करणवीरने आईचे पत्र वाचताच त्याचे अश्रू अनावर झाले आणि तो ओमंगसमोर रडायला सुरुवात करतो.
यावेळी चुम दारंग हिच्या बहिणीचे पत्र तिला मिळणार आहे यामध्ये तिच्या बहिणीने लिहिले आहे की तू पासीघाट गावाचं नाव मोठं केलं आहेस यावेळी चुम भावुक होताना दिसली. त्याचबरोबर शिल्पा शिरोडकर हिच्या पतीचे पत्र तिला मिळणार आहे.
Contestant gets emotional after reading letters from their loved ones. #ShilpaShirodkar #chumdarang #Biggboss18 #bb18 #KaranveerMehra #VivianDsena #AvinashMishra #EishaSingh pic.twitter.com/o1U9sd2RJF
— Film window (@Filmwindow1) January 15, 2025
करणवीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर करणवीरचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. व्हिडिओ शेअर करताना एका यूजरने लिहिले की, शेवटी करणवीरला त्याच्या आईकडून काहीतरी मिळाले. तू करणवीर जिंकण्यास पात्र आहेस. दुसऱ्या युजरने लिहिले की, प्रोमोमध्ये मी तुला रडताना पाहू शकत नाही, मी संपूर्ण एपिसोड कसा पाहणार आहे. तिसऱ्या यूजरने लिहिले की, ईशाला रडताना पाहिल्यानंतर ती अभिनय करत असल्याचे स्पष्ट झाले. पण करणवीर मेहरा किती भावूक होत आहे हे पाहून मला एवढेच म्हणायचे आहे की देव तुम्हाला ट्रॉफी जिंकण्यात मदत करो. आपण ते पात्र आहात. करणवीर मेहरा जिंकावा, अशी इच्छा अनेक युजर्सनी व्यक्त केली.
सध्या ईशा सिंग, रजत दलाल, अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, चुम दारंग, विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा घरात आहेत. आजच्या एपिसोडमध्ये शिल्पा शिरोडकरला घरातून बाहेर काढले जाऊ शकते. बिग बॉस लवकरच घरातील सदस्यांना त्यांच्या बिग बॉसच्या प्रवासाची झलक दाखवणार आहे.