फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस १८ चा फिक्स विनर : सध्या सोशल मीडियावर बिग बॉस १८ ची प्रचंड चर्चा सुरू आहे. मागील आठवड्यामध्ये झालेल्या विकेंडच्य वॉरमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत चर्चा पाहायला मिळाली. मागील आठवड्यामध्ये झालेल्या विकेंडच्या वॉरमध्ये सलमान खान आणि बिग बॉस ७ ची स्पर्धक काम्या पंजाबी हिने विवियन डीसेनाची शाळा घेतली होती. यावेळी तिने विवियनला खडतर भाषेमध्ये खडसावले होते. काम्याच्या अनेक वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता. काम्या प्रत्येक सीझनमध्ये होणाऱ्या घटनांवर बऱ्याचदा तिचे मत मांडत असते. आता पुन्हा एकदा विकेंडच्या वॉरनंतर काम्या चर्चेचा विषय ठरली आहे.
विकेंडच्या वॉरच्या वेळी काम्या विवियनला म्हणाली होती की तू संपूर्ण सिझन काही केले नाही आहेस एवढे वर्ष शोला नाही म्हणाला होतास या वर्षी का शोला हा का म्हणाला होतास, यावर सलमान खान सुद्धा सहमत झाला होता. यानंतर विवियनला बराच राग आला होता यावेळी त्याने काम्या पंजाबी त्याची मैत्रीण नाही आणि तिच्याबद्दल बरच काही तो म्हणाला होता. या घटनेनंतर विवियन डीसेनाच्या चाहत्यांनी त्याच्या समर्थनात सोशल मीडियावर काम्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते.
Bigg Boss 18 : होणार डबल इव्हिक्शन! रजत किंवा चाहत यांना घराबाहेर काढण्याचा निर्णय
आता अभिनेत्री काम्या पंजाबीने एका मुलाखतीमध्ये बिग बॉसच्या मेकर्सचां काळ सत्य उघड केलं आहे. काम्या मुलाखतीमध्ये म्हणाली की, मी तर कधीच म्हणाली नाही की मी विवियनची मैत्रीण आहे म्हणून ना मी कधी सोशल मीडियावर म्हणाली नाही मी कधी मुलाखतीमध्ये म्हणाली. जेव्हा बिग बॉस सुरू झालं होत तेव्हा त्याच्या (विवियन दिसेना) पत्नीने मला मेसेज केला होता कारण त्याआधी तर मी शोमध्ये ज्याप्रकारे स्पर्धक खेळत आहेत त्याप्रकारे मी ट्विस्ट आणि माझे विचार मांडले होते. शोच्या सुरुवातीपासून मला करणवीर, अविनाश चुम यांचा खेळ आवडत होता आणि मी त्याच्याबद्दल सोशल मीडियावर उघडपणे मतं मांडली आहेत.
पुढे काम्या म्हणाली की, माझी जर एवढीच मैत्री असती तर मी त्याला त्यावेळीच पूर्णपणे सपोर्ट केला असता. तो जमाना गेला आहे जेव्हा तू शोमध्ये बसून राहशील आणि तुला जिंकावतील. चॅनेल जर त्याला जिंकावयाचे आहे तर मग मला पाठवलं होत की त्याला जाग कर तुला आम्ही दिलेल्या ट्रॉफीला न्याय दे लोकांनी म्हटलं पाहिजे की शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये याचा खेळ बदलला म्हणून तो ट्रॉफीचा हकदार आहे. यावर आता सोशल मीडियावर शोच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. काहीही करता जर शोचा विजेता घोषित केला जाणार आहे तर मग उर्वरित सदस्यांच्या मेहनतीवर नक्कीच अन्याय असणार आहे.