फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया
बिग बॉस 18 फॅमिली वीक : बिग बॉस १८ मध्ये सध्या कौटुंबिक आठवडा सुरू आहे. पहिल्या दिवशी चाहत पांडेची आई भावना पांडे आली, तिने घरात प्रवेश करताच अविनाश मिश्राची क्लास घेतली आणि सगळ्या घरातल्या सदस्यांसमोर त्याला सुनावले. चाहतच्या आईने अविनाशवर अनेक मोठे आरोप केले. आता अविनाश मिश्रा याची पुन्हा आगामी भागामध्ये क्लास लागणार आहे. शोच्या नवीन प्रोमोमध्ये कशिश कपूरची आई फॅमिली वीकसाठी आल्याचे दिसून आले आहे. घरात प्रवेश करताच तिने अविनाशवर फायर मोडमध्ये तीन मोठे आरोप केले. सोशल मीडियावर कलर्सच्या अकाऊंवर नवा प्रोमो आला आहे यावर एकदा नजर टाका.
बिग बॉस १८ चा लेटेस्ट प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये आगामी एपिसोडची झलक दाखवण्यात आली आहे. चुम दारंगची आई आधी घरात प्रवेश करणार आहे आणि तिच्या नंतर रजत दलालची आई आणि श्रुतिकाचा नवरा अर्जुन घरात प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर करणवीर मेहराची बहीण आगामी भागामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री दाखवली जाणार आहे. सगळ्यात शेवटी कशिश कपूरच्या आईने एंट्री घेतली आणि ती येताच तिने कशिशसोबत अविनाश मिश्राचा अँगलवर क्लास घ्यायला सुरुवात केली. त्याची एक झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळाली आहे.
कशिश कपूरच्या आईने अविनाश मिश्रावर ३ मोठे आरोप केले आणि सांगितले की, तो घरी राहत असताना सिम्पथी कार्ड खेळत आहे. प्रोमोनुसार, कशिशची आई अविनाशला म्हणाली, ‘अविनाश, तू एका छोट्या गोष्टीतून एवढा मोठा गोंधळ केला आहेस.’ ती पुढे म्हणाली की, ‘तुला हवे असते तर हे प्रकरण तिथेच संपू शकला असता, पण तु पीडितेसारखे वागलात.’
Kashish ki maa ko hai Avinash se problem, kya woh samjha paayega apna point of view? 🤔
Dekhiye #BiggBoss18, 6th Jan se Mon-Fri raat 10:30 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par.@bellavita_org #Vaseline @Parle2020cookie #ChingsSecret #Harpic #GoCheese… pic.twitter.com/WRhi0896uH
— ColorsTV (@ColorsTV) January 3, 2025
कशिशच्या आईने पुढे सांगितले की, ‘पुरुषाची कृती कोणी पाहत नाही, पण राष्ट्रीय टीव्हीवर मुलीचे चारित्र्य नष्ट करणे योग्य आहे का?’ याआधी चाहत पांडेच्या आईने अविनाश मिश्राला खूप क्लास दिली होती. घराबाहेर मोठा न्यायालय आपली वाट पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. आता कशिश कपूरच्या आईने अविनाशच्या क्लासेसची व्यवस्था करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
अविनाश मिश्राने फक्त बिग बॉस १८ फॅमिली वीकच्या दोन्ही दिवशी क्लास घेतला, त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्याला ‘टेम्पल बेल’ म्हणायला सुरुवात केली आहे. उल्लेखनीय आहे की, गेल्या आठवड्यातच कशिश कपूरने अविनाशवर आरोप केला होता की, त्याने त्याला अँगल करण्यास सांगितलं होता. या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. यानंतर बिग बॉसने घरात कोर्टही बसवले. यावेळी करणवीर मेहराने अविनाश मिश्राची बाजू मांडली होती.