फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस 18 चे इव्हिक्शन : टेलिव्हिजनवरच्या चर्चेत रिॲलिटी शो बिग बॉस 18 च्या फिनालेसाठी फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यासाठी घरातले सदस्य फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी त्यांचे सर्वस्व पणाला लावत आहेत. या आठवड्यामध्ये घरामध्ये नऊ सदस्य शिल्लक आहेत, यामधील तीन सदस्य घराबाहेर जाण्यासाठी यावेळी नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी रजत दलाल, श्रुतिका अर्जुन आणि चाहत पांडे हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहेत. या आठवड्यात डबल इविक्शन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Bigg Boss 18 : काम्या पंजाबी संतापली! मेकर्सच्या फिक्स विनरच नाव केलं रिव्हिल
फिनालेकडे वाटचाल करत असताना बिग बॉस सध्या घरातल्या सदस्यांसमोर अनेक नवनवीन मोठे आव्हान उभे करत आहेत. आता बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसने नवा ट्विस्ट आणला आहे. आगामी भागामध्ये बिग बॉस काही फॅन्सला घरामध्ये एन्ट्री करण्याची संधी देणार आहेत. यामध्ये फॅन्सला नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी एकाला घराबाहेर काढण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये काही खबरी पेजने दिलेल्या माहितीनुसार श्रुतिका अर्जुनला घरामध्ये आलेला फॅन्सने घराबाहेर जाण्यासाठी वोट केले आहे. अजूनपर्यंत या संदर्भात बिग बॉसने कोणतेही अधिकृत माहिती किंवा एपिसोडमध्ये दाखवण्यात आलेले नाही परंतु श्रुतिका अर्जुन घराबाहेर गेल्याचे समोर आले आहे.
🚨 Shrutika Arjun has been EVICTED from Bigg Boss 18 house in Mid week eviction.
There is going to be another eviction in Weekend Ka Vaar.
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) January 8, 2025
या आठवड्यामध्ये डबल इव्हिक्शन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये रजत दलाल आणि चाहत पांडे या दोघांमधील कोणाला तरी घराबाहेर काढले जाऊ शकते. या आठवड्यामध्ये तिकीट टू फिनालेच्या शर्यतीसाठी टास्क खेळवण्यात आला. या टास्कमध्ये बिग बॉसने नॉमिनेट नसलेल्या सदस्यांना फिनाले आठवड्यामध्ये जाण्याची संधी दिली होती. या खेळात स्पर्धकांना शर्यतीच्या मार्फत सर्वात आधी जो अंड उचलेल त्याला पुढे जाण्याची संधी मिळणार होती यावेळी करणवीर मेहरा याने त्याची मैत्रीण चुम दारंगसाठी खेळला तर विवियन डीसेना हे दोघे तिकीट टू फिनालेसाठी पात्र ठरले आहेत.
आता आगामी भागामध्ये चुम दारंग आणि विवियन डीसेना यांच्यामध्ये फायनलच्या आठवड्यामध्ये जाण्यासाठी टास्क खेळवला जाणार आहे यामध्ये घातले सदस्य टास्कमध्ये हिंसा करताना दिसत आहेत यामध्ये आता बिग बॉस यावर काय निर्णय घेणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.
या आठवड्यामध्ये डबल इव्हिक्शन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये रजत दलाल आणि चाहत पांडे या दोघांमधील एक सदस्याला विकेंडच्या वॉरमध्ये बाहेर केले जाऊ शकते. त्यामुळे आता घरातला कोणता सदस्य घराबाहेर जाणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.