(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“बिग बॉस १९” या रिॲलिटी शोमध्ये दररोज नवीन ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अलिकडेच अभिषेक बजाज आणि अशनूर कौरमुळे संपूर्ण घराला शिक्षा झाली. कॅप्टन मृदुल तिवारीच्या कॅप्टनशिपमध्येही दुरावा निर्माण झाला. आता, “बिग बॉस १९” च्या घराला त्याचा नवा कॅप्टन, प्रणित मोरे सापडला आहे. अखेर प्रणितला ‘बिग बॉस’च्या घराची सत्ता मिळाली आहे. आता या खेळाला आणखी रंगत येणार आहे. या बातमीने प्रणितच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
या आठवड्यात, गौरव खन्ना, प्रणित मोरे, मालती चहर आणि शाहबाज बदेशा यांनी कॅप्टनशिपसाठी टास्क जिंकला. बिग बॉसने सर्वांना असेंब्ली रूममध्ये बोलावले आणि त्यांना कॅप्टन म्हणून पाहू इच्छिणाऱ्या दोन स्पर्धकांना मतदान करण्यास सांगितले. प्रणित मोरे आणि शाहबाज यांना सर्वाधिक मते मिळाली. पुढे, एक टास्क घेण्यात आला ज्यामध्ये घरातील सदस्य प्रणित मोरे किंवा शाहबाज बदेशा यांना कॅप्टन बनवायचे असेल तर जास्तीत जास्त चेंडू टाकतील असे ‘बिग बॉसने सांगितले. प्रणित मोरे हा टास्क जिंकला आहे आणि घराचा नवा कॅप्टन बनला आहे.
🚨 Pranit More becomes the new captain of the Bigg Boss 19 house. Complete dominance in the captaincy task, thanks to Gaurav, Ashnoor, Abhishek & Malti helping him in each round. The task was for HMs to grab the maximum balls and give them to the contenders to stick. — BBTak (@BiggBoss_Tak) October 28, 2025
प्रणित मोरेने गौरव खन्ना, अभिषेक बजाज, अशनूर कौर, मालती चहर आणि मृदुल तिवारी यांच्या मदतीने हा विजय मिळवला. चाहते देखील प्रणित मोरेसाठी खूप आनंदी आहेत कारण त्यांना विश्वास आहे की स्पर्धक घराची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळू शकेल. चाहते देखील कंमेंट करून त्याला चांगला प्रतिसाद देत आहे. एका वापरकर्त्याने प्रणितचे अभिनंदन केले आणि लिहिले, “प्रणितचे अभिनंदन, मला आशा आहे की या घरात भांडणे कमी होतील. भांडणे थांबू नयेत, मी हा भाग एन्जॉय करणार आहे.” तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “वाह, प्रणित आता चांगला दिसत आहे कारण त्याचे घरातील सर्वांशी एक प्रकारचे चांगले नाते आहे.”
Bigg Boss 19 : बिग बाॅसच्या घरातला कॅप्टन खचला! सदस्यांचे टोमणे ऐकून डोळ्यातून आले अश्रू, पहा Promo
घराचा नवा कॅप्टन बनलेला मृदुल तिवारीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहे. अभिषेक आणि अशनूरला वाचवण्यासाठी मृदुलने इतर नऊ स्पर्धकांना नामांकनात ढकलले. आता, घराबाहेर पडणाऱ्या स्पर्धकांमध्ये तान्या मित्तल, कुनिका सदानंद, नीलम गिरी, गौरव खन्ना, अमाल मलिक, मालती चहर, फरहाना भट्ट, प्रणित मोरे आणि शाहबाज बदेशा यांचा समावेश आहे. गेल्या भागात, जेव्हा काही घरातील सदस्यांनी काम करण्यास नकार दिला तेव्हा कॅप्टन मृदुल तिवारीने सर्व जेवण केले आणि भांडी धुतली. यामुळे येणाऱ्या भागात घरातील स्पर्धकांवर मृदुल भडकताना दिसणार आहे.






