फोटो सौजन्य - Jio Cinema
बिग बॉस सिझन १८ : बिग बॉस सिझन १८ दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीत येत आहे. या सीझनमध्ये पहिल्या दिनापासून बरेच वाद पाहायला मिळत आहेत. आता सीझनचा दुसरा आठवडा सुरु आहे आणि या आठवड्यामध्ये अनेक मोठे वाद पाहायला मिळाले. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये बिग बॉसच्या घरामधून अविनाश मिश्राला घराबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर आता बिग बॉसच्या घरामध्ये आता बिग बॉसने नवा ट्विस्ट घराच्या सदस्यांसाठी आणला आहे.
घरामधील सदस्य बिग बॉस सिझन १८ चा पूर्ण दुसरा आठवडा राशन म्हणजेच जेवणासाठी बिग बॉसकडे मागणी करत होते. त्यामुळे आता बिग बॉसने स्पर्धकांसमोर राशन मिळवण्याचे दोन पर्याय ठेवले. यावेळी बिग बॉसने घरच्यांना सांगितले की, तुमच्याकडे दोन पर्याय आहेत यामध्ये पहिला पर्याय आहे की, तुम्हाला घरामधील दोन सदस्यांना जेलमध्ये टाकावे लागणार आहे, तर बिग बॉसने घरच्यांना दुसरा पर्याय दिला की मागच्या आठवड्यामध्ये कोणत्याही सदस्यांला घराबाहेर काढण्यात आले नाही. त्यामुळे जे सदस्य मागील आठवड्यामध्ये नॉमिनेट होते त्याच्यामधील एक सदस्यांना घराबाहेर काढावे लागणार आहे.
यावर मोठा वाद घरच्या सदस्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर बिग बॉसच्या घरांमधून १० सदस्यांच्या मते अविनाश मिश्राला केलेल्या कृत्यामुळे बाहेर काढण्यात यावर अशी घोषणा केली जाते. त्यानंतर बिग बॉस अविनाश मिश्राला घराबाहेर काढतो. त्यानंतर बिग बॉस घोषणा करतो कि तुमचे राशन आले आहे आणि तुम्हाला राशन देणारा सुद्धा घरामध्ये आला आहे. राशन देणारा हा दुसरा कोणी नसून अविनाश मिश्रा पुन्हा घरामध्ये एंट्री करतो. यावेळी तो दिवसभर न जेवलेल्या सदस्यांना माफी मागायला सांगतो आणि तेव्हाच मी तुम्हाला राशन देणार अशी अट त्यांच्यासमोर ठेवतो. त्याचबरोबर तो म्हणतो कि करणवीर मेहरा सगळ्या घरच्या सदस्यांसमोर त्याने माफी मागणं गरजेचं आहे.
यावर करणवीर या गोष्टीला पूर्णपणे नकार देतो आणि म्हणतो की मी त्याची माफी मागणार नाही. बरेच घरांमधील सदस्य जेवण मागण्यासाठी अविनाशकडे जातात आणि परंतु तो नकार देतो. आता पुढील भागामध्ये काय होईल हे पाहणं मनोरंजक ठरेल.