Sanjay Dutt (फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
ॲक्शन थ्रिलर बागी फ्रँचायझीच्या पुढील चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. आता या चित्रपटामधील खलनायकाचा चेहराही समोर आला आहे. सिनेविश्वातील खरा ‘खलनायक’ संजय दत्त साजिद नाडियादवालाच्या बागी 4 मध्ये खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. अभिनेत्याचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे, जे पाहून तुमच्या शरीराचा थरकाप होईल. गेल्या महिन्यात टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट बागी 4 ची घोषणा करण्यात आली होती. आता निर्मात्यांनी आणखी एक सरप्राईज देऊन चाहत्यांना हैराण केले आहे. यावेळी खलनायकी जबरदस्त असेल, कारण संजय दत्तने चित्रपटात प्रवेश केला आहे.
बागी 4 मध्ये संजय दत्तची एन्ट्री
सोमवारी टायगर श्रॉफ आणि साजिद नाडियादवाला यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बागी 4 च्या खलनायकाचे अनावरण केले. त्याने संजय दत्तचे एक जबरदस्त पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये या अभिनेत्याचा लूक पाहून कोणीही दंग होईल. या पोस्टरमध्ये अभिनेता एका खतरनाक लूकमध्ये दिसत आहे. खुर्चीवर एका मुलीचा मृतदेह धरून बसलेला, रक्ताने माखलेला संजय दत्त ओरडताना पोस्टरमध्ये दिसून येत आहे. अभिनेत्याचा हा लुक कोणालाही चकित करून टाकेल असा आहे.
या पोस्टरच्या वर ‘प्रत्येक प्रियकर हा खलनायक असतो’ असे कॅप्शन लिहिले आहे. या पोस्टर आणि कॅप्शनवरून असे दिसते की, प्रेम गमावल्यानंतर अभिनेता खलनायक बनतो. या चित्रपटात संजय दत्तच्या एन्ट्रीने प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. चाहत्यांना आता हा चित्रपट पाहण्याची आतुरला लागून राहिली आहे.
चाहत्यांच्या मिळाल्या प्रतिक्रिया
एका यूजरने फायर इमोजीसह लिहिले, “काय होणार आहे. यावेळी माझे मन आतुरले आहे.” दुसऱ्याने लिहिले: “वाह, शक्तिशाली.” एकजण म्हणाला, “अरे देवा. यावेळी मोठा धमाका होणार आहे.” एका युजरने आधीच हा चित्रपट ब्लॉकबस्टर असल्याचे घोषित केले आहे. एका युजरने खलनायकाच्या भूमिकेत संजय दत्तचे वर्णन केले आहे. इतर वापरकर्ते देखील फायर आणि हार्ट इमोजीसह बागी 4 चा नवीन खलनायक पसंत करत आहेत. चित्रपट रिलीज आधीच चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
साजिद नाडियादवाला निर्मित, बागी 4 चे दिग्दर्शन ए. हर्ष करत आहेत. बागी फ्रँचायझीचा हा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट 5 सप्टेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. आतापर्यंत फक्त टायगर आणि संजयचे लूक समोर आले आहेत. हिरोईनबाबत अजूनही सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये कोणती अभिनेत्री काम करणार हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.