(फोटो सौजन्य- Xअकाउंट)
1997 मध्ये रिलीज झालेला जेपी दत्ता यांचा बॉर्डर हा चित्रपट त्या काळातील सर्वात मोठा हिट ठरला होता आणि बॉक्स ऑफिसवर तो सर्वकालीन ब्लॉकबस्टर म्हणून घोषित झाला होता. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता ज्यामध्ये सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, पुनीत इस्सार, सुदेश बेरी, कुलभूषण खरबंदा आणि इतर अनेक कलाकार दिसले होते. चित्रपटाच्या यशाने उत्साही होऊन जेपी दत्ता यांनी अलीकडेच बॉर्डर २ या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. आता 27 वर्षांनंतर, केसरी फेम अनुराग सिंग दिग्दर्शित बॉर्डर 2 सह फ्रेंचायझी मोठ्या पडद्यावर परतला आहे.
हे स्टार कास्ट दिसणार आहेत 
सनी देओल पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना सैनिकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी आधी येत होती. मात्र, त्या बातमीत तथ्य नव्हते. यानंतर सनी देओलने अधिकृतपणे घोषणा केली की वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ हे या चित्रपटाचा भाग असणार आहेत. आता त्यात चौथा सैनिकही दाखल झाला आहे. अभिनेता सुनील शेट्टी पहिल्या भागात भैरव सिंहच्या भूमिकेत दिसला होता. आता त्याच्या सिक्वेलमध्ये ज्युनियर शेट्टी म्हणजेच अभिनेत्याचा मुलगा अहान शेट्टी दिसणार आहे. सनी देओलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाची अधिकृत माहिती शेअर केली आहे.
हे देखील वाचा- “येक नंबर मोमेंट” तेजस्विनी पंडितने आईसाठी शेअर केली खास पोस्ट!
चित्रपट कधी होणार प्रदर्शित 
‘बॉर्डर 2’ हा चित्रपट २०२६ मध्ये 23 जानेवारीला रिलीज होणार आहे. जेपी दत्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत नसून त्यांची मुलगी निधी दत्ता ही या चित्रपटाची निर्माती करत आहे. यावेळीही चित्रपटाची कथा किंवा त्याचा काही भाग भारत आणि पाकिस्तानमधील परस्पर युद्धावर आधारित असण्याची शकता आहे. बॉर्डर चित्रपटानंतर ‘बॉर्डर 2’ पाहण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.






