(फोटो सौजन्य - Instagram)
रिया कपूरने आज तिच्या सोशल मीडिया हँडलवर जान्हवी कपूरचा लेटेस्ट लुक शेअर केला आहे, ज्यामध्ये ती १९८७ च्या YSL रिव्ह गौचे या ड्रेसमध्ये दिसली. ऐश्वर्या राय बच्चनचा लेटेस्ट लुकही नेहमीप्रमाणे स्टायलिश दिसत होता. यावेळी ऐश्वर्याला तिची मुलगी आराध्याचा पाठिंबा मिळाला. तसेच अभिनेत्री मुलगी आराध्यासोबत या कान फिल्म फेस्टिव्हल सहभागी झाली होती. ज्याचा व्हिडीओ आणि फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रियाने शेअर केली इंस्टाग्राम पोस्ट
जान्हवी कपूर सध्या फ्रान्समधील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहे. तिथून, तिने सलग अनेक लुकने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आणि आज, तिचा आणखी एक कान्स लुक समोर आला आहे, जो तुम्हाला १९८७ आणि १९९१ च्या फॅशन स्टाईलमध्ये घेऊन जाईल. रियाने जान्हवीचा लेटेस्ट लुक इंस्टाग्रामवर शेअर केला आणि कॅप्शन दिले, “काल रात्री कान्समध्ये @janhvikapoor आर्काइव्हल YSL, @anamikakhanna.in आणि @chopard मधील @amfar गाला येथे. YSL रिव्ह गौचे, १९८७ मधील शिल्पात्मक सॉसर हॅट आणि १९८९ मधील मखमली जॅकेट असलेल्या माझ्या आवडत्या यवेस सेंट लॉरेंटच्या वर्षांना आदरांजली वाहत आहे.’ असे लिहून रियाने ही पोस्ट शेअर केली आहे.
Cannes च्या पदार्पणासाठी निघाली आलिया भट्ट, चित्रपट महोत्सवात सहभागी न होण्याच्या बातमीला पूर्णविराम
जान्हवीचा हा खास लुक कोणत्या वर्षाचा आहे?
या पोस्टद्वारे रियाने जान्हवीचा हा लुक कोणत्या वर्षाचा आहे हे देखील सांगितले. रियाने इंस्टाग्रामवर पुढे लिहिले की, ‘आम्ही ते १९८७ ते १९९१ दरम्यानच्या यवेसच्या काव्यात्मक काळापासून प्रेरित असलेल्या शीअर सिल्क शिफॉन स्कर्टसोबत जोडले – अनामिका खन्ना यांनी कस्टम-मेड केले – आणि चोपार्डच्या सर्वात उत्कृष्ट पिवळ्या हिऱ्यांनी लुक पूर्ण केला आहे.’ जान्हवी कपूरचा हा लेटेस्ट लुक सेलिब्रिटी आणि चाहत्यांना खूप आवडतो आहे. भूमी पेडणेकरने लिहिले, ‘लव्ह इट’, महीप कपूरने लिहिले, ‘स्टनिंग’. जान्हवीच्या अनेक चाहत्यांनी तिच्यावर आगीचे आणि हृदयाचे इमोजींचा वर्षाव केला आहे.’
अखेर ठरलं! ‘बिग बॉस १९’ लवकरच सुरु होणार; सलमान खान होस्टिंग करणार की नाही? जाणून घ्या
ऐश्वर्या राय बच्चनचा लुक
पहिल्या दिवशी ऐश्वर्या भारतीय साडी परिधान करताना दिसली, तर दुसऱ्या दिवशी तिने चकित करणारा लुक परिधान करून सर्वांचे मन जिंकले. ऐश्वर्या राय बच्चनचा दुसरा लुक खूपच आधुनिक आणि स्टायलिश होता. ऐश्वर्या काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली आणि तिने तिच्या ग्लॅमरस स्टाईलने सर्वांचे मन जिंकले. तिच्या ग्लॅमरस वॉकपासून ते कान्स कार्पेटवरील तिच्या उपस्थितीपर्यंत, तिने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
ऐश्वर्याला तिची मुलगी आराध्याचा पाठिंबा मिळाला
ऐश्वर्याची मुलगी आराध्या बच्चन या ग्लॅमरस वॉकपूर्वी रेड कार्पेटवर जाताना तिचा हात घट्ट धरून असल्याचे दिसून आले. आराध्या तिच्या आईसोबत रेड कार्पेटवर चालली नसली तरी त्यांच्यातील नात्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. ऐश्वर्या नेहमीप्रमाणे तिची मुलगी आराध्याला मीडियापासून वाचवताना दिसली. त्याचे संपूर्ण लक्ष आराध्यावर दिसत होते. दोघीनांही एकत्र पाहून चाहत्यांना चांगला आनंद झाला.