(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम नुकत्याच ११ व्या शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळचे त्यांचे काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केलं आहेत. फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेल्यानंतर त्यांनी हिमाचल प्रदेशची सांस्कृतिक ओळख असणारी पट्टू साडी नेसली होती, यावेळीची एक खास पोस्ट त्यांनी केली आहे. या पोस्ट सोबत त्यांनी त्यांच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत.
छाया कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये हिमाचल प्रदेशच्या संस्कृतीची ओळख असणारी पट्टू साडी नेसवली जात असल्याचे दिसत आहे. त्यांनी हा व्हिडिओ टाकताना त्यांच्या भावना देखील कॅप्शनमध्ये लिहिल्या आहेत.यात त्यांनी लिहिले आहे, “जशी माती : तशा रीती. ११ व्या शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या निम्मिताने देवभूमी मानल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशसारख्या सुंदर राज्याला भेट देता आली.” तसेच इतक्या सुंदर देवभूमीतली माणसे जितकी आपलीशी वाटणारी होती, अगदी तशीच मला ही पट्टू साडी नेसल्यावर एका वेगळ्या आपलेपणाची ऊब मिळाली, त्या म्हणाल्या खूप खूप धन्यवाद देवकन्या हा सुंदर असा पट्टू साडीचा उबदार अनुभव देण्यासाठी.
ऐश्वर्याच्या वैयक्तिक हक्कांवर दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, AI जनरेटेड कंटेंटवर केली बंदी
या पोस्टवर अनेक चाहत्यांनी हॉर्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केलं आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये छाया कदम यांच्या लाल या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग झाले. त्याबरोबरच चित्रपटसृष्टीतील त्यांचा आजपर्यंतच्या कामासाठी विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.