(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दिल्ली उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की कोणतीही वेबसाइट, यूट्यूब चॅनेल किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्म अभिनेत्रीच्या परवानगीशिवाय तिचे नाव, चित्र, आवाज किंवा कोणत्याही प्रकारची एआय-जनरेटेड सामग्री वापरू शकत नाही. असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने घेतला आहे.
TIFF मध्ये ‘होमबाउंड’ च्या प्रीमियरमध्ये जान्हवी कपूरचा जलवा; चाहत्यांसोबत काढले फोटो, दिले ऑटोग्राफ
ऐश्वर्याच्या याचिकेत काय लिहिले?
ऐश्वर्या रायने तिच्या याचिकेत म्हटले आहे की, ‘कॉफी, मग आणि इतर वस्तू विकण्यासाठी अवास्तव अंतरंग अभिनेत्रींचे फोटो वापरली गेली आहेत. ज्या स्क्रीनशॉटमध्ये फोटोमध्ये छेडछाड केली गेली आहे ते कधीही ऐश्वर्या रायचे नव्हते. हे सर्व एआय जनरेटेड फोटो आहेत.’ असे अभिनेत्रीच्या याचिकेमध्ये लिहिले गेले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश
न्यायाधीश तेजस कारिया यांनी अंतरिम आदेश जारी करून स्पष्ट केले की सेलिब्रिटींच्या ओळखीचा गैरवापर त्यांच्या प्रतिष्ठेला आणि सन्मानाला धक्का पोहोचवतो. जर हे त्वरित थांबवले नाही तर त्यामुळे केवळ आर्थिक नुकसानच होणार नाही तर ऐश्वर्या आणि तिच्या कुटुंबाच्या सामाजिक प्रतिमेवरही परिणाम होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. आणि अभिनेत्रीच्या कोणत्याही परवानगी शिवाय कोणतेही फोटो घेण्यास सक्त मनाई केली आहे नाहीतर पुढे असे झाल्यास कारवाई करण्यात येईल असे त्यांचे म्हणणे आहे.
नेहल, फरहाना नाही तर ‘या’ सुंदरीच्या मागे आहे बसीर अली, ‘बिग बॉस’च्या घरात दिसला नवा लव्ह अँगल
या स्टार्सनीही न्यायालयात घेतली होती धाव
ऐश्वर्या राय व्यतिरिक्त, अभिषेक बच्चननेही व्यक्तिमत्त्व हक्कांसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या आधी, त्याच्या वडिलांनीही त्याच्या हक्कांसाठी न्यायालयात धाव घेतली होती. या यादीत अनिल कपूरपासून ते जॅकी श्रॉफपर्यंतची नावे आहेत ज्यांनी त्यांचा आवाज, चित्र, संवाद आणि प्रतिमेचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली.