(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
पहलगाम हल्ल्याबाबत देशभरात अजूनही तोच राग दिसून येत आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका स्वीकारली. तथापि, पाकिस्तान भारताला धमकी देण्यासही मागे हटत नाही. दरम्यान, फवाद खान आणि वाणी कपूर यांच्या ‘अबीर गुलाल’ या चित्रपटावरही पाकिस्तानने बंदी घातली आहे. भारताने आधीच या चित्रपटावर बंदी घातली होती आणि आता पाकिस्ताननेही हे पाहून हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान चांगलाच अडचणीत अडकला आहे. अनेक वर्षांनी ‘अबीर गुलाल’ या चित्रपटातून अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. परंतु आता दोन्ही देशांनी या चित्रपटावर बंदी घातली आहे.
‘अबीर गुलाल’ चित्रपटावर पाकिस्तानने घातली बंदी
वरिष्ठ पाकिस्तानी वितरक सतीश आनंद यांनी टीव्ही 9 शी बोलताना याची पुष्टी केली. सीमेपलीकडील तणावामुळे चित्रपट उद्योगात मोठ्या आर्थिक नुकसानीची चिंता निर्माण झाली आहे. चित्रपटावरील बंदीबद्दल बोलताना सतीश म्हणाले की, ‘अबीर गुलाल’ हा आगामी चित्रपट पाकिस्तानमध्येही प्रदर्शित होणार नाही. यामागे वाणी कपूर हे कारण असल्याचे म्हटले जात आहे.
प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता काळाच्या पडद्याआड, मराठी फिल्म इंडस्ट्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर
या बंदीमागे वाणी कपूर कारणीभूत
सतीश आनंद यांनी पुढे सांगितले की, या चित्रपटात एक भारतीय नायिका (वाणी कपूर) आहे आणि भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. यासोबतच त्यांनी चित्रपटामुळे झालेल्या नुकसानाबद्दलही सांगितले. त्यांनी सांगितले की चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ खरोखरच वाईट आहे आणि त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. ‘अबीर गुलाल’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट ९ मे रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता दोन्ही देशांमध्ये (भारत आणि पाकिस्तान) त्यावर बंदी घालत आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक Shaji N. Karun यांचे निधन, ‘या’ गंभीर आजाराने घेतला जीव!
भारताने आधीच चित्रपटावर बंदी घातली आहे.
‘अबीर गुलाल’ चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि भारतीय अभिनेत्री वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटातील गाणीही यूट्यूबवरून काढून टाकण्यात आली आहेत आणि आता दोन्ही देशांमध्ये त्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आता या चित्रपटाचे भविष्य काय आहे हे पाहणे बाकी आहे. कारण हा चित्रपट भारतात किंवा पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही.