Marathi Actor Prakash Bhende Passes Away
प्रसिद्ध मराठी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि वितरक प्रकाश भेंडे यांची प्राणज्योत मालवली आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रकाश भेंडे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. प्रकाश भेंडे गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दुर होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रकाश भेंडे पेशाने एक प्रसिद्ध अभिनेते तर होतेच, पण ते उत्तम चित्रकार देखील होते.
‘साजिदने मला बोलावले अन्…’, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केला साजिद खानवर धक्कादायक आरोप!
प्रकाश भेंडे यांचे निधन वृद्धापकाळामुळे झाले असून ते गेल्या अनेक दिवसांपासून वृद्धापकाळामुळे जडणाऱ्या आजारामुळे आजारी होते. दरम्यान, प्रकाश भेंडे यांचे निधन काल (२८ एप्रिल) झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे या प्रकाश भेंडे यांच्या पत्नी होत्या. प्रकाश यांच्या पश्चात २ मुले प्रसाद भेंडे आणि प्रसन्न भेंडे, सुना श्वेता महाडिक-भेंडे आणि किमया भेंडे आणि नातवंड असा परिवार त्यांच्या पश्चात होता. त्यांचा थोरला मुलगा आणि सून हे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत.
बादशाहच्या नवीन गाण्यावर एफआयआर दाखल, Velvet Flow रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात!
दरम्यान, उमा भेंडे आणि प्रकाश भेंडे या दोघांनीही अनेक मराठी चित्रपटांमध्ये एकत्रित काम केले होते.. प्रकाश भेंडे यांनी मराठी चित्रपटात अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि वितरक म्हणून काम केलं आहे. भालू, चटक चांदणी, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, नाते जडले दोन जीवांचे अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये प्रकाश यांनी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. तर यातील अनेक चित्रपटांचे प्रकाश यांनी निर्मिती ही केली आहे. प्रकाश भेंडे पेशाने एक प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि वितरक तर होतेच, पण ते उत्तम चित्रकार देखील होते.






