(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
17 नोव्हेंबरपासून Snapchat वापरकर्त्यांना ‘Pushpa The Movie’ आणि ‘Mythri Movie Makers’ च्या अधिकृत Snapchat हँडलवरून खास पडद्याआडचे क्षण, झलक, आणि अपडेट्स पाहू शकतात. तसेच, चाहते ट्रेलर लॉंच, गाण्यांच्या रिलीजच्या तारखा, आणि इतर रोमांचक अपडेट्स Snapchat वर रिअल-टाइममध्ये सर्वात आधी जाणून घेऊ शकणार आहेत. याशिवाय, आयकॉन आणि स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन Snapchat वर सामील झाले असून, त्यांच्या चाहत्यांना त्यांचा प्रामाणिक आणि वेगळा बाजू पाहता येणार आहे. अभिनेत्याच्या पेजला फॉलो करा आणि अधिक माहिती तुम्हाला प्राप्त होणार आहे. Snapchat वापरणाऱ्यांना चित्रपटातील श्रीलीलाच्या रंगीबेरंगी डान्स नंबरची पहिली झलक देखील पाहायला मिळेल.
“पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या…” ‘पुष्पा २: द रूल’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
या भागीदारीबद्दल बोलताना निर्माते नवीन येरनेनी आणि रवी शंकर म्हणाले, “Pushpa 2: The Rule” हा चित्रपट चाहत्यांशी घट्टपणे जोडलेला आहे, आणि Snapchat, ज्याचा Gen Z मध्ये मोठा प्रभाव आहे, हा चाहत्यांना ॲक्शनच्या जवळ नेण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म आहे. आम्ही या प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी करून चाहत्यांना खास चित्रपटाच्या पडद्याआडचे क्षण, झलक, आणि रिअल-टाइम अपडेट्स देण्यासाठी उत्सुक आहोत, ज्यामुळे चाहते देखील या प्रवासाचा भाग असल्याची भावना निर्माण होईल.” असे त्यांनी सांगितले.
पुष्पा २ लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. यावेळी पुष्पा- द रुलमध्ये एका वेगळ्या धाडसाची ॲक्शन पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की यावेळी पुष्पाची ताकद दुप्पट झाली आहे, जी त्याच्या शत्रूंना दूर करण्यासाठी पुरेशी आहे. भाग २ मध्ये पुष्पाच्या शत्रूंची संख्या वाढली असून अभिनेत्याची शक्तीही वाढली आहे.
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आता लवकरच ‘पुष्पा’ या चित्रपटामधून चाहत्यांची भेट घेणार आहे. पुष्पा २ मध्ये पुष्पा राज, श्रीवल्ली आणि भवनसिंग शेखावत यांच्याशिवाय पहिल्या भागात इतर पात्रांची ओळख करून देण्यात आली आहे. पण यावेळी पुष्पा 2 च्या कथेत काहीसा सस्पेन्स आहे, ज्याचा इशारा ताज्या ट्रेलरमधून दिसून येत आहे. काही नवीन पात्रांच्या एंट्रीने ते तयार केले आणि चाहते 5 डिसेंबरला पुष्पाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. हा चित्रपट रिलीज होताच चाहते सिनेमागृहात धुमाकूळ घालताना दिसणार आहे.