फोटो सौजन्य - Social Media
चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात फहद फासिल दिसणार असल्याचेही सांगितले जात आहेत. आता अलीकडेच इम्तियाज अलीने स्वत: फहद या चित्रपटाचा एक भाग असेल याची पुष्टी केली आहे आणि त्याच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक ‘इडियट्स ऑफ इस्तंबूल’ हे आहे. इम्तियाज अलीने चित्रपटात मल्याळम अभिनेता फहाद फासिलच्या उपस्थितीला मान्यता दिली आहे. याद्वारे फहाद बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इम्तियाजने त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल उत्सुकता व्यक्त केली.
रहस्य, रोमांच आणि हॉररने भरलेल्या Aghathiyaa-Angels Vs Devil चा मोशन पोस्टर रिलीज, लूकने वेधलं लक्ष
‘वेळेपूर्वीच घोषणा झाली’ असे का म्हणाले?
इम्तियाज अलीने अलीकडेच हॉलिवूड रिपोर्टरला दिलेल्या मुलाखतीत ‘द इडियट ऑफ इस्तंबूल’ या आगामी चित्रपटाबद्दल स्पष्टपणे बोलले. ते म्हणाले, ‘जाहीर झाले आहे. पण, ते वेळेपेक्षा थोडे पुढे आहे. हा चित्रपट बनत आहे, पण पुढचा चित्रपट असेल की नाही हे मला माहीत नाही. पण, हो, मी बऱ्याच दिवसांपासून हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचे नाव आहे ‘द इडियट ऑफ इस्तंबूल’. मला तो बनवायला आवडेल आणि मला हा चित्रपट फहादसोबत करायचा आहे.’ असे त्यांनी सांगितले.
पुढील वर्षी शूटिंग सुरू होईल
रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात तृप्ती डिमरीसोबत फहद फासिल दिसणार आहे. फहद फासिल अलीकडेच ‘पुष्पा 2’ चित्रपटात दिसला आहे. प्रेक्षक त्याच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे शूटिंग 2025 च्या पहिल्या तिमाहीत सुरू होणार आहे. ‘जब वी मेट’ आणि ‘तमाशा’ सारखे हिट सिनेमे देणाऱ्या दिग्दर्शक इम्तियाजचा हा पुढचा मोठा हिट सिनेमा असू शकतो, अशी प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
Retro: सूर्याने ख्रिसमसनिमित्त चाहत्यांना दिले सरप्राईज; टीझरसह ४४ व्या चित्रपटाचे नाव केले अनावरण!
‘पुष्पा 2’ मधील फहादच्या भूमिकेला प्रेम मिळत आहे
इम्तियाज अलीने याच वर्षी ‘अमर सिंह चमकिला’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा अभिनीत चित्रपट एप्रिलमध्ये OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला होता. फहादबद्दल बोलायचे तर तो ‘पुष्पा 2’ मध्ये IPS भंवर सिंह शेखावतच्या भूमिकेत दिसला आहे. त्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.