(फोटो सौजन्य- Xअकाउंट)
आज 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देश हा आनंद साजरा करत आहे. लहान मुले असोत वा वृद्ध, प्रत्येकजण देशभक्तीच्या रंगात रंगलेला दिसतो. या खास प्रसंगी सिने जगतातील अनेक स्टार्सनी सर्व भारतीयांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आणि चाहत्यांना खास संदेश देखील दिला आहे. बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारने तिरंग्याचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, आमचा ध्वज सदैव उंच राहू द्या आणि आमचे हृदय अभिमानाने उंच होऊ द्या.’ असे अभिनेत्याने लिहिले.
May our flag always fly high and our hearts soar with pride.
हमारी स्वतंत्रता को नमन. आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं. जय हिंद 🇮🇳 pic.twitter.com/enKF0Q5rCr— Akshay Kumar (@akshaykumar) August 15, 2024
अभिनेत्याने X वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी पुढे लिहिले की, ‘आमच्या स्वातंत्र्याला सलाम. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.’ असं लिहून चाहत्यांना अक्षयने शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेता विकी कौशलचे वडील आणि ॲक्शन डायरेक्टर शाम कौशल यांनीही इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने इंस्टाग्राम स्टोरीजवर ध्वजाचा व्हिडिओ पोस्ट केला आणि खाली कॅप्शनमध्ये लिहिले, ‘स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, जय हिंद.’ तर, अभिनेता सोनू सूदने स्वातंत्र्य दिन एका खास पद्धतीने साजरा केला आहे. त्याची झलक शेअर करत त्याने X वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
Happy independence day 🇮🇳 pic.twitter.com/XJPAop82fp
— sonu sood (@SonuSood) August 15, 2024
The nation proudly celebrates our 78th year of independence today, August 15. On this joyous occasion, i wish all of you a very Happy Independence Day!
Jai Hind!🇮🇳 pic.twitter.com/QQbTpcXkLm— Hema Malini (@dreamgirlhema) August 15, 2024
अभिनेत्री हेमा मालिनी यांनी X वर लिहिले, ‘देश आज १५ ऑगस्ट रोजी आपल्या स्वातंत्र्याचा ७८ वा वर्धापन दिन अभिमानाने साजरा करत आहे. या आनंदी प्रसंगी, मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते!’ असं त्यांनी लिहिले, तर अभिनेत्री कंगना राणौतनेही तिरंगा झेंडा फडकावत एक फोटो शेअर केला आहे.
याचदरम्यान, यावेळी अभिनेते अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ संदेश सांगितला आहे. अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हा सर्वांना अभिनंदन आणि शुभेच्छा. आज आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या भूतकाळातील अनेक ज्ञात-अज्ञात लोकांनी बलिदान दिले आहे. त्यांचे स्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे. भारताचा विजय असो!” असे अभिनेत्याने लिहिले आणि चाहत्यांना खास संदेश दिला.