(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर मोठा इतिहास रचला आहे. भारताने २०२५ चा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा दमदार पराभव केला आहे. यामुळे भारतात सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. देश आनंदात बुडाला आहे. बॉलीवूड सेलिब्रिटी देखील महिला क्रिकेट संघाला विजयाबद्दल अभिनंदन करत सतत पोस्ट करत आहेत. अनेक कलाकारांनी भारतीय टीमचे अभिनंदन केले आहे आणि अभिमानास्पद म्हटले आहे.
अजय देवगणने केले अभिनंदन
बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने टीमचे अभिनंदन केले आणि लिहिले, “कधीही विसरता येणार नाही अशी रात्र. धन्यवाद, विजेते. या संघाने जगाला दाखवून दिले की खरे धैर्य आणि विश्वास काय करू शकतो.” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
‘आम्ही दोघी’ नंतर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र; ‘असंभव’मधून रंगणार रहस्यमय कथा
हृतिक रोशननेही आपला आनंद केला व्यक्त
हृतिक रोशनने लिहिले, “आम्ही जिंकलो. ऐतिहासिक. पहिला महिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल भारताचे अभिनंदन. ही फक्त सुरुवात आहे, अजून बरेच काही पाहायला मिळणार आहे. माझे प्रेम आणि आदर.” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
तसेच बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने लिहिले, “आम्ही विश्वविजेते आहोत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०२५ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. आमच्या मुलींनी दाखवून दिले आहे की दृढनिश्चय आणि संघभावनेने कोणतेही ध्येय साध्य करता येते. जय हिंद!”
सनी देओलनेही शेअर केली पोस्ट
सनी देओलने लिहिले, “भारत चिरंजीव असो. आज माझ्या बहिणींनी इतिहास रचला. भारताने पहिला महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. किती हा पराक्रम! या अटळ स्त्री शक्तीचा अभिमान आहे. तुम्ही तिरंगा फडकवला आहे. हा विजय प्रत्येक भारतीयाचा विजय आहे.”
अभिषेक बजाजच्या Ex पत्नीने अशनूर कौरसोबतच्या नात्यावर केली टीका, म्हणाली “२१ वर्षांच्या मुलीसोबत…”
नीता अंबानी तिरंगा फडकवत आनंद व्यक्त करतानाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नीता अंबानी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचल्या होत्या. भारताच्या विजयाने त्या खूप उत्साहित होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन करताना अनुपम खेर यांनी लिहिले, “विजय…विजय…विजय…भारताचा विजय. भारत माता की जय. वंदे मातरम. भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेता आहे.” करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनीही पोस्ट शेअर करून भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. अशाप्रकारे अनेक सेलिब्रिटींनी आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.






