(फोटो सौजन्य - x अकाउंट)
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि काजोल-राणी मुखर्जी यांचे काका रोनो मुखर्जी यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. रोनो मुखर्जी हे एका प्रसिद्ध चित्रपट कुटुंबातील होते आणि ते बऱ्याच काळापासून चित्रपटांशी जोडले गेले होते. ते काजोल, राणी मुखर्जी आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे काका होते. रोनो मुखर्जी यांच्या निधनाच्या बातमीने शोक पसरला आहे. तसेच त्यांच्या अंत्यसंस्कारच्या वेळीस अनेक बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती दिसली.
पुतण्या अयान आणि भाची तनिषा अंतिम निरोप देण्यासाठी पोहोचले
बुधवारी मुंबईत रोनो मुखर्जी यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक लोक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. त्यांच्या कुटुंबासह अनेक कलाकारही उपस्थित होते. ‘ब्रह्मास्त्र’ सारखे चित्रपट बनवणारा त्यांचा पुतण्या अयान मुखर्जी आणि अभिनेत्री तनिषा मुखर्जी हे देखील अंतिम दर्शनासाठी पोहोचले. दोघेही खूप भावनिक दिसत होते आणि त्यांनी त्यांच्या काकांना निरोप दिला.
केजीएफच्या मेकर्सने हृतिक रोशनसोबत केली हातमिळवणी, ‘वॉर २’पेक्षाही करणार जबरदस्त ॲक्शन
काही महिन्यांत कुटुंबासाठी ही दुसरी मोठी दुःखद बातमी आहे. या वर्षी १४ मार्च रोजी होळीच्या दिवशी अयान मुखर्जीचे वडील आणि अभिनेते देब मुखर्जी यांचेही निधन झाले. कुटुंब अद्याप त्या दुःखातून सावरले नव्हते तेव्हाच आता रोनो मुखर्जी यांनी देखील या जगाचा निरोप घेतला. संपूर्ण मुखर्जी कुटुंबामध्ये शोककळा पसरली आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, अनुराग कश्यपच्या चित्रपटातून करणार डेब्यू
रोनो मुखर्जी यांचे काम
रोनो मुखर्जी यांनी त्यांच्या कारकिर्दीत ‘हवाईं’ आणि ‘तू ही मेरी जिंदगी’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले. रोनो मुखर्जी हे ‘तू ही मेरी जिंदगी’ या चित्रपटाचे संगीतकार देखील होते. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली. ते त्यांच्या शांत स्वभावासाठी आणि सर्जनशील विचारसरणीसाठी ओळखले जात होते.