फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस 18 : टेलिव्हिजन त्याचबरोबर संपूर्ण भारतामध्ये चर्चित असलेला वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉस १८ लां प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर बिग बॉसच्या घरामध्ये असलेल्या सदस्यांच्या पसंतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या बिग बॉस १८ चां हा बारावा आठवडा सुरू आहे त्यानंतर आता फिनाले फक्त तीन आठवडे दूर आहे. जसजसा बिग बॉसचां खेळ संपत आहे तसतसा हा खेळ आणखीनच मनोरंजक होत चालला आहे. त्याचबरोबर स्पर्धकांमध्ये कॉम्पिटिशन सुद्धा वाढत चालले आहे. घरातले सदस्य देखील आणखीनच आक्रमक होत चालले आहेत.
आता या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये मुद्दा गाजला तो म्हणजेच अविनाश मिश्रा यांच्यावर कशिश कपूरने केलेले आरोप. यावर संपूर्ण घरातल्या सदस्यांनी त्याचबरोबर अविनाश आणि कशिश यांच्यामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून अविनाश मिश्रा आणि कशिश कपूर यांच्या घरात वाद सुरू होता. यामागचे कारण म्हणजे पूल साइड संभाषण ज्यामध्ये अविनाशवर कशिशसोबत फ्लर्ट केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्याच्यासोबत वेगळा अँगल आणण्याबद्दल बोलले जात होते. या प्रकरणावरून घरात एवढा गदारोळ झाला की अविनाशचे चारित्र्यही बिघडले.
या घटनेवरून बिग बॉसने अदालत बोलावली होती. यामध्ये करणवीर मेहरा हा अविनाश मिश्राचा वकील होता तर रजत दलाल कशिश कपूरचा वकील होता. करणवीर मेहराने त्याचे अनेक मुद्दे कशिशच्या विरोधात मांडले पण रजत दलाल त्यावर फार काही बोलू शकला नाही. यादरम्यान करणवीर मेहराने कशिशवर ती वूमन कार्ड खेळत असल्याचा आरोप केला होता. अदालतमध्ये करणवीर मेहरा अविनाशच्या समर्थानात म्हणाला की, तुम्ही मुद्दाम हा मुद्दा घेऊन आला आहेत आणि सांगायचं झालं तर तुम्ही वूमन कार्ड खेळत आहेत. या घटनेवर बऱ्याच वेळा चर्चा झाली त्यानंतर करणवीर मेहरा या टास्कमध्ये विजयी ठरला.
शनिवारी सलमान खान विकेंडच्या वॉरला येणार आहे यावेळी तो या घटनेवर काय सांगणार कोण दोषी ठरणार यावर प्रेक्षकांचे लक्ष्य असणार आहे. या विकेंड अनेक मजेशीर पाहुणे घरामध्ये येणार आहे, त्याचबरोबर नवीन वर्षाचे ग्रँड सेलिब्रेशन सुद्धा होणार आहे. सलमान खानचा आज वाढदिवस आहे त्यामुळे घरामध्ये आज सलमान खानच्या खास दिनी घरातले सदस्य त्याच्यासाठी काही तरी खास करणार आहेत. त्याचबरोबर असेही सांगितले जात आहे की, कंगणा रनौत, मिक्का सिंह हे सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहेत.