फोटो सौजन्य - सोशल मीडिया
करणवीर मेहरा विरुद्ध विवियन डीसेना : टेलिव्हिजन दोन प्रसिद्ध अभिनेते करणवीर मेहरा आणि विवियन दिसेना यांच्यामध्ये नेहमीच बिग बॉसच्या घरामध्ये कधी वाद तर कधी मैत्रीचं नातं पाहायला मिळालं आहे. मागील दोन आठवडे घराचा टाईम गॉड म्हणून बिग बॉसने विवियन दिसेनाला घरामधील पॉवर दिल्या होत्या. तर या आठवड्यामध्ये रजत दलाल घराचा टाईम गॉड आहे. आता विवियन दिसेना आणि करणवीर मेहरा यांच्यामध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळणार आहे. कालच्या भागानंतर सोशल मीडियावर एक प्रोमो आला आहे. यामध्ये आता विवियन डीसेना आणि करणवीर मेहरा यांच्यामध्ये जोरदार भांडण पाहायला मिळणार आहे.
बिग बॉस १८ संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये करणवीर मेहरा विवियन डीसेनाला म्हणतो की, जेव्हा तू टाईम गॉड झाला होता तेव्हा तू स्वतः चे नियम तयार केले होतेस की टाईम गॉड काम करू शकत नाही. यावर यावर विवियन डीसेना म्हणतो की टेपची कॅसेट आहेस दोन्ही साईडने वाजत असतो. यावर करणवीर मेहरा म्हणतो की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि सांग अस कोणी सांगितलं होत की टाईम गॉड काम करू शकत नाही. यावर विवियन म्हणतो ऐक जरा आणि जा भांडी घास…यावर करणवीर मेहरा भडकतो आणि विवियनला म्हणतो की मी घाणेरड्या वस्तू साफ करतो आणि मला फक्त संधी द्या मी चमकवून टाकेल एकदम आणि मी जोपर्यंत कोपऱ्यात होतो तोपर्यंत शांत आहे. जर माझ्यासोबत काड्या करायचा प्रयत्न केला तर एक एक चांगलच बघणार आहे.
आज बिग बॉसच्या प्रेक्षकांचा सर्वात मजेशीर टास्क खेळवला जाणार आहे. या टास्कसाठी बिग बॉस चाहते प्रचंड उत्सुक असतात. आज बिग बॉसच्या घरातील मुलांना एका बॉक्स जेलमध्ये टाकणार आहेत. यामध्ये मुली आज मुलांना टॉर्चर म्हणेजच छळ करताना दिसणार आहेत. प्रदर्शित झालेल्या प्रोमो मध्ये चुमच्या निशाण्यावर अविनाश मिश्रा असणार आहे तर विवियन दिसेना चाहत पांडेच्या निशाण्यावर असणार आहे. करणवीर मेहराला सारा त्याचबरोबर इशा सिंह टॉर्चर करताना दिसणार आहेत.
Tomorrow Episode – TORTURE TASK IS HERE!!!!! 🔥 And Karan Veer vs Vivian. pic.twitter.com/UI1s5yESlD
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) November 19, 2024
या आठवड्यामध्ये घराचा टाईम गॉड रजत दलालकडे नॉमिनेशनची पॉवर देण्यात आली होती. यामध्ये बिग बॉसने सांगितले होते की घरामधील सदस्यांना तुम्ही कोणत्या स्पर्धकाला किती नॉमिनेट करायचे अधिकार देऊ शकतात. यामध्ये या आठवड्यात सात सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये करणवीर मेहरा, विवियन डीसेना, अविनाश मिश्रा, कशिश कपूर, दिग्विजय राठी आणि एलिस कौशिक हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.