(फोटो सौजन्य-Social Media)
करीना कपूर खान ही उत्कृष्ट अभिनेत्रींनपैकी एक आहे. जिने चाहत्यांच्या मन वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त चाहते तिला शुभेच्छा देत आहेत, पण तुम्हाला माहीत आहे का की करिनाच्या वडिलांना तिने चित्रपटात प्रवेश करावा असे वाटत नव्हते? मात्र, आज करीना कपूर खानच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी जाणून घेऊया ज्यांना आता करीन आपली मुलगी असल्याचा अभिमान वाटत आहे.
लहानपणापासूनच अभिनयाची होती आवड
करीना कपूरला लहानपणापासूनच अभिनयाच्या दुनियेत येण्याची इच्छा होती. तिला चित्रपटांची खूप आवड होती आणि ती प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस आणि मीना कुमारी यांच्यापासून प्रेरित होती. मात्र वडील रणधीर कपूर या निर्णयाच्या विरोधात होते. कुटुंबातील महिलांना चित्रपटात काम करता येत नाही, कारण त्याचा परिणाम कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांवर होतो, असे त्यांचे मत होते. तरीही अभिनेत्रीने आपली इच्छा पूर्ण केली. आणि तिने या हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
अभिनेत्रींच्या आईने दिली साथ
करीनची आई बबिता यांनी आपल्या मुलीला नेहमीच पाठिंबा दिला. जेव्हा रणधीर कपूरने चित्रपटात काम करण्यास नकार दिला तेव्हा बबिताने करीनाला पूर्ण पाठिंबा दिला. या निर्णयामुळे रणधीर आणि बबिता यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि दोघेही वेगळे राहू लागले. बबिता यांनी आपल्या मुलींना एकट्याने वाढवले आणि त्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या करिअरलाही हातभार लावला. करीना आणि करिश्मा आज जे काही आहेत, ते त्यांच्या आईच्या मेहनतीमुळे आणि पाठिंब्यामुळे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत, आणि याची जाणीव या दोन्ही मुलींना आहे.
अभिनेत्रीने कठोर परिश्रमाने यश मिळवले
अर्थात रणधीर कपूरने सुरुवातीला करिनाला चित्रपटांमध्ये काम करण्यापासून रोखले, पण आपल्या मेहनतीच्या जोरावर करीनाने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिने ‘जब वी मेट’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘बजरंगी भाईजान’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले, अभिनेत्रीने तिचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. आता रणधीर कपूरला आपल्या मुलींचा अभिमान वाटतो आणि त्यांची पत्नी बबिता ही खरी मार्गदर्शक होती असा त्यांचा विश्वास आहे.
वडिलांची बदललेली विचारसरणी
आपल्या मुलीची मेहनत आणि यश पाहून करीनाच्या वडिलांनी आता विचार बदलला आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘आता मला माझ्या मुलींचा अभिमान आहे आणि त्यांनी स्वत:च्या बळावर यश मिळवले याचा खूप आनंद आहे.” असे अभिनेत्याने सांगितले होते. करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी देखील अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केले असून त्यांचे सगळे चित्रपट सुपरहिट आहेत.
हे देखील वाचा- १०० नव्हे तर ७० दिवसात संपणार बिग बॉस मराठी? सोशल मीडियावर उडाली खळबळ!
आता करीना चित्रपटांमध्ये झळकत आहे
करीना कपूर खान आजही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. ती सतत मोठ्या प्रोजेक्ट्सचा भाग बनत असते आणि तिचे चाहते नेहमीच तिच्या नवीन चित्रपटांची वाट पाहत असतात. कभी खुशी कभी गमच्या चित्रपटापासून ते जब वी मेटच्या गीतापर्यंत आणि आता बकिंघम मर्डर्सच्या जेस बमराहच्या पात्रापर्येंत करीना कपूर खानने तिच्या अभिनयाने नेहमीच सर्वांची मने जिंकली आहे. आज अभिनेत्रीचा वाढदिवस असल्यामुळे तिला चाहत्यांसह अनेक मोठ्या कलाकार देखील शुभेच्छा देत आहेत.