(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री खुशी मुखर्जीचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती एका पोलिस अधिकाऱ्याशी वाद घालताना दिसत आहे. ती एका दुकानातून फटाके उचलून रस्त्यावर फेकतानाही दिसत आहे. खुशीसोबत असे काय घडले ज्यामुळे ती संतापलेली दिसत आहे. तसेच अभिनेत्रीच्या आजूबाजूला लोकांची गर्दी झाली आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.
स्वतःच्या विचित्र शैली आणि असामान्य ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत आलेली अभिनेत्री खुशी मुखर्जी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण, यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. यावेळी ती तिच्या कपड्यांमुळे नाही तर तिच्या कृतींमुळे चर्चेत आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अभिनेत्री मुंबईच्या रस्त्यावर एका दृश्याचे चित्रीकरण करताना दिसत आहे.
खुशी मुखर्जीचा गुलाबी साडीतला हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ती भर रस्त्यात असलेल्या दुकानातून फटाके उचलून रस्त्यावर फेकताना दिसत आहे. तेवढ्यात एक पोलिस अधिकारी येताना दिसत आहे. त्यानंतर एक माणूस पोलिस अधिकाऱ्याला सांगतो की तिला मारहाण केली जाईल. त्यानंतर अभिनेत्री पोलिसांना सांगते की कोणीतरी तिच्या गाडीला धडक दिली आहे. त्यानंतर अभिनेत्री पोलिस अधिकाऱ्याशी वाद घालू लागते.
मुंबईतील रस्त्यावर अभिनेत्रीने घातला गोंधळ
व्हिडिओची सुरुवात खुशी मुखर्जीने एका फटाक्यांच्या दुकानातून एक एक करून फटाके उचलून रस्त्यावर फेकताना होत आहे. त्यानंतर ती म्हणते, “प्रत्येकाने दिवाळी साजरी करावी.” हा व्हिडिओ आजचा नाही तर दिवाळीच्या आसपासचा आहे. परंतु, तो आता व्हायरल होत आहे. आणि आता सोशल मीडियावर चाहते त्याला प्रतिसाद देत आहेत.
ईशा आणि आकाश अंबानीच्या वाढदिवसाचा सुरु झाला जल्लोष, चमकणार जामनगर; ‘हे’ बॉलीवूड सितारे होणार सामील
अभिनेत्रीने पोलिसांसोबतही भांडताना दिसली
खुशी रस्त्यावर हा गोंधळ घालत असताना दिसले की, एक पोलिस त्यांच्या बाईकवरून जात आहे. हा वाद पाहून तो पोलिस थांबतो. त्यानंतर व्हिडिओमध्ये खुशीच्या गोंधळाच्या दरम्यान फटाक्यांचा विक्रेता, बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना म्हणताना दिसतो की, हिला समजाव, हिचं जरा जास्तच होतंय, मार खाऊन जाईल इथून”. यावर अभिनेत्री मोठ्याने ओरडून म्हणते, “तो माझ्या गाडीला धडक देऊन गेला, हे सगळे इथेच होते.” त्यावर विक्रेता म्हणतो, “आम्ही तुमच्या गाडीचा ठेका घेतलाय का?”






