(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
“ड्रामा क्वीन राखी सावंत जेव्हापासून भारतात आली आहे, तेव्हापासून सतत चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.. काही दिवसांपूर्वी राखी सावंतचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यात ती मीका सिंगसोबत दिसत होती. आता पुन्हा राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ती मीका सिंगवर अनेक आरोप करत आहे आणि म्हणत आहेत की ‘त्यांच्या मुळे मी मुंबई सोडून चाली आहे.”
“राखी सावंत आणि मीका सिंग यांची वर्षानुवर्षांची वादग्रस्त चर्चा आपल्याला सर्वांना आठवतेच, पण आता दोघे त्या वादाला मागे ठेवून पुढे गेले आहेत. काही दिवसांपूर्वी राखी सावंत आणि मीका सिंग एकत्र दिसले होते, जिथे दोघे खूप धमाल करत होते. पण असं दिसतंय की राखी सावंत पुन्हा मीका सिंगवर नाराज झाली आहे. त्यामुळे तिने मीका सिंगवर अनेक आरोप केले आहेत.
“राखी सावंतचा अलीकडचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो मुंबई एयरपोर्टचा आहे. या व्हिडीओत राखी सावंतने मीका सिंगवर अनेक आरोप केले आहेत. राखी म्हणाली, ‘मी मुंबई सोडून जात आहे, कारण मीका सिंग यांनं माझा अपमान केला. मी मीका सिंगला सांगितले की तुझं गाणं रिलीज होणार आहे, त्यामुळे मी पण येते ते प्रमोट करण्यासाठी आणि माझ्या गाण्याचं प्रमोशन करण्यासाठी, पण मीका म्हणाला की नाही नाही, तिथे कोणी येऊ शकत नाही, हा फक्त खास प्रायव्हेट लोकांसाठीचा इव्हेंट आहे. आता मी तिथला व्हिडीओ पाहिला, तर तिथे अनेक लोक आले आहेत, कोण आले माहित नाही, मीका सिंग यानं माझा अपमान केला.’’ मीका सिंग यानं राखी सावंतला आपल्या इव्हेंटमध्ये बोलावले नाही, त्यामुळे ड्रामा क्वीन नाराज होऊन मुंबई सोडत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीचा गैरफायदा, मुंबईत ४९ वर्षीय प्रसिद्ध संगीतकाराला अटक
एक काळ होता जेव्हा राखी सावंत आणि मीका सिंग एका बर्थडे पार्टीत धमाल करताना दिसले होते. डान्स करत असताना मीका सिंगने राखी सावंतला किस केले. किस होताच राखी सावंत मीका सिंगवर रागावल्या होती. आजही राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतो. या व्हिडीओमुळे मीका सिंग चांगलाच चर्चेत आला होता. वर्षांनंतर राखी सावंतने या किसिंग घटनेचा उल्लेख करून लोकांच्या मनात ही घटना पुन्हा ताजी केली आहे.






