(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी दक्षिणेतील अभिनेत्यासोबत तिचा आगामी चित्रपट ‘गेम चेंजर’च्या प्रदर्शनाच्या तयारीत व्यस्त आहे. अभिनेत्री शनिवारी एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी होणार होती. मात्र, आरोग्याच्या समस्यांमुळे ती या कार्यक्रमाचा भाग होऊ शकली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता कियाराच्या टीमने तिचे हेल्थ अपडेट शेअर केले आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना जास्त काळजी वाटणार नाही.
अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते
कियाराच्या टीमने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “कियारा अडवाणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही, तिला थकवा आल्याने विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे, कारण ती सतत काम करत आहे.” असे टीमने माहिती देऊन चाहत्यांचे प्रश्न दूर केले आहे.
कियारा पत्रकार परिषदेत सहभागी होणार होती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणी राम चरणसोबत ‘गेम चेंजर’च्या प्रेस मीटमध्ये सहभागी होणार होती. मात्र, तब्येत बिघडल्याने ती यात सहभागी होऊ शकली नाही. अभिनेत्री सध्या आराम करत आहे. ज्यामुळे ती चाहत्यांना कोणत्याही इव्हेंटमध्ये सहभागी होताना दिसणार नाही आहे.
‘बिग बॉस’मध्ये सामील झाली होती
‘बिग बॉस 18’ च्या ‘वीकेंड का वार’ भागात अभिनेत्री दिसली. यावेळी त्यांनी स्पर्धकांशी संवादही साधला. या शोच्या सेटवरील अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच अभिनेत्रीचा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री साकारणार व्हिलनची भूमिका? लूक बघून चाहत्यांना बसला धक्का
कियारा आणि राम चरणचा चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
कियारा अडवाणी आणि राम चरण यांचा ‘गेम चेंजर’ चित्रपट 10 जानेवारीला सिनेमागृहात दाखल होणार आहे. ‘गेम चेंजर’मध्ये, कियारा राम चरणच्या व्यक्तिरेखेची प्रियसी म्हणून दिसणार आहे. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशनसोबत ‘वॉर 2’ मध्येही दिसणार आहे. अभिनेत्रीचे आगामी चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अभिनेत्री शेवटची ‘सत्य प्रेम कि कथा’ या चित्रपटामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन सोबत दिसली.