2014 साली चित्रपटसृष्टीत एंट्री करणारा राघव जुयाल आता मोठ्या पडद्याचा खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. डान्स इंडिया डान्स रिॲलिटी शोमधून पदार्पण करणारा राघव जुयाल हा देखील एक उत्तम अभिनेता आहे यात शंका नाही. राघव आत्तापर्यंत वेब सीरीज आणि चित्रपटांचा भाग आहे. 2014 मध्ये सोनाली केबल या चित्रपटात त्याने काम केले होते. यानंतर तो ABCD 2, नवाबजादे, स्ट्रीट डान्सर 3 सारख्या चित्रपटात काम करताना प्रेक्षकांना दिसला होता. आता अलीकडेच त्याचा ‘किल’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये तो प्रथमच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच आता अलीकडेच त्याने या चित्रपटातील त्याच्या पात्राबद्दल सांगितले असून त्याने त्याच्या चित्रपट प्रवासाची तुलना शाहरुख खानशी केली आहे.
शाहरुख खाननेही असाच प्रवास सुरू केला – राघव जुयाल
राघव जुआल किल हा चित्रपट खूप खास मानतो. यामध्ये त्याला पहिल्यांदाच खलनायक बनण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटाशी जोडल्याबद्दल राघव म्हणतो, “मला नेहमी पडद्यावर खलनायकाची भूमिका करायची होती. मी ऑडिशनचा पहिला सीन वाचला तेव्हा माझ्या आतला आवाज आला की ही व्यक्तिरेखा अभिनेता म्हणून एक नवीन प्रवास सुरू करणार आहे. त्यामुळे हे पात्र साकारण्यासाठी मी तयार झालो, असे त्याने सांगितले.
पुढे तो म्हणाला, ‘मी याआधी चित्रपट केले असले तरी काहीतरी वेगळे असणार हे या व्यक्तिरेखेमध्ये हे मला माहीत होते. जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला वाटले की मला त्यात अनेक छटा साकारण्याची संधी मिळेल. पात्र खूप क्रूर आहे, पण त्याला जिवंत करणे हे माझे काम आहे. मला ही व्यक्तिरेखा साकारताना खूप मज्जा आली, असे राघव म्हणाला.
शाहरुख सरांनी टीव्हीवर अँकरिंगही केले. त्यानंतर त्यांचा चित्रपटातील खलनायक म्हणून प्रवास सुरू झाला. माझ्यासोबतही असेच घडते आहे. अँकरिंग केल्यानंतर आता मला चित्रपटात खलनायक बनण्याची संधी मिळाली आहे. ही समानता मला चांगली वाटते. असे अभिनेता राघव जुयालने सांगितले.
‘किल’ या चित्रपटामध्ये हिंसाचार दाखवला जात असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरु आहे. राघव म्हणतो, हा एक सिनेमा आहे ही एक कथा आहे. आम्ही या चित्रपटामध्ये कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याबाबत बोलत नाही आहोत. एक सैनिक नैतिकतेच्या आधारावर माझ्या चारित्र्याच्या बरोबरीने लढत आहे. त्याला स्वतःची कारणे आहेत. या सगळ्यावर आधारित या चित्रपटाची कथा सादर करण्यात आली आहे.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मारल्या पाहिजेत? असे विचारल्यावर राघव म्हणाला, आधी चित्रपट शूट करा आणि मग थेट चित्रपटगृहात दाखल करा. त्या चित्रपटाचे प्रोमोशन वाढवा, खरे तर त्यासाठी खास तयारी करावी लागते ती करा. अजून एक गोष्ट सांगायला हवी की सगळ्यांना हिंदी येत असेल तर त्यांनी विनाकारण इंग्रजी बोलू नका. असे राघवने सांगितले.