(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सोनी लिव्हवरील बहुप्रतिक्षित सिरीज ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’ येत्या १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे आणि चाहते या सिरीजची रीलीज तारीख जाणून घेण्याची वाट पाहत आहेत. डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांच्या प्रख्यात पुस्तकावर आधारित सिरीज ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’ भारताच्या स्वातंत्र्यामधील महत्त्वपूर्ण क्षणांना प्रकाशझोतात आणते. या सिरीजमध्ये प्रतिभावान कलाकारांनी प्रख्यात स्वातंत्र्यसेनानींची भूमिका साकारली आहे. या कलाकारांपैकी एक आहेत मलिष्का मेंडोन्सा, ज्यांनी या सिरीजमध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधील क्रांतिकारी लीडर सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारली आहे.
हे देखील वाचा- रणबीर कपूर आणि साई पल्लवीचा ‘रामायण’ चित्रपट कधी रिलीज होणार ? दिग्दर्शकांनी शेअर केली डेट
नायडू यांचा लुक प्राप्त करण्यासाठी मलिष्का यांनी मेकअप चेअरवर दररोज ४ तास घालवले आहेत आणि स्वःताला एक आघाडीची अभिनेत्री म्हणून साध्य केले आहे. या प्रक्रियेबाबत सांगताना अभिनेत्री म्हणाली, “प्रोस्थेटिक्स परिधान करण्याचे आव्हान होते. मी दररोज मेकअपसाठी खूप वेळ घालवला आहे, दिवसाला जवळपास ९ तास लागत होते, ज्यानंतर प्रोस्थेटिक्स योग्यरित्या बसवले जायचे. सरोजिनी नायडू यांच्यासारखे दिसण्यासोबत वावरण्याच्या आव्हानांचा देखील सामना करावा लागला. सूर्यप्रकाशात प्रोस्थेटिक्स वितळायचे, प्रोस्थेटिक्सखाली माझ्या चेहऱ्यावर सतत घाम येत होता. यामुळे माझ्या चेहऱ्यावर घाम न येण्यासाठी आणि प्रोस्थेटिक्स वितळण्याला थांबवण्यासाठी मी सावलीमध्ये एसीच्या समोर बसत होते.” असे अभिनेत्रीने सांगितले.
तसेच, अभिनेत्रीने सिरीज ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’च्या टीमचे अविरत पाठिंब्यासाठी आभार देखील व्यक्त केले, तसेच त्यांच्यामधील परिवर्तनाचे श्रेय त्यांना दिले. ती पुढे म्हणाली, “मेकअप आर्टिस्ट्सपासून आमचे दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्यापर्यंत सर्वांनी सर्वकाही परिपूर्ण असण्याच्या खात्रीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सेटवर त्यांची समर्पितता दिसत होती. प्रत्येक कलाकार आणि टीममधील सदस्याने सिरीज उत्तम होण्यासाठी अथक मेहनत घेतली आहे. आव्हानांचा सामना केल्यानंतर देखील मिळालेले फळ उल्लेखनीय आहे. मी प्रेक्षकांना ही सिरीज पाहताना बघण्यास अत्यंत उत्सुक आहे. ही अत्यंत विशेष सिरीज आहे.” असे तिने सांगितले.
हे देखील वाचा- स्वप्नील जोशी निर्मित “सुशीला – सुजीत” चित्रपटाचा मुहूर्त संपन्न!
स्टुडिओनेक्स्टसोबत सहयोगाने एम्मी एंटरटेन्मेंट मोनिषा अडवाणी आणि मधू भोजवानीद्वारे निर्मित या शोचे दिग्दर्शक निखिल अडवाणी यांनी केले आहे. या सिरीजमध्ये प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. जसे की जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेत सिद्धांत गुप्ता, महात्मा गांधी यांच्या भूमिकेत चिराग वोहरा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेत राजेंद्र चावला, मुहम्मद अली जिना यांच्या भूमिकेत आरिफ जाकारिया, फातिमा जिना यांच्या भूमिकेत ईरा दुबे, सरोजिनी नायडू यांच्या भूमिकेत मलिष्का मेंडोन्सा, लियाकत अली खान यांच्या भूमिकेत राजेश कुमार, व्ही. पी. मेनन यांच्या भूमिकेत केसी शंकर, लॉर्ड लुईस माऊंटबॅटन यांच्या भूमिकेत ल्यूक मॅकगिबनी, लेडी एडविना माऊंटबॅटन यांच्या भूमिकेत कॉर्डलिया बुगेजा, आर्चीबाल्ड वेव्हेल यांच्या भूमिकेत अॅलिस्टर फिन्ले, क्लेमेंट अॅटली यांच्या भूमिकेत अँड्र्यू कुलुम, सिरील रॅडक्लिफ यांच्या भूमिकेत रिचर्ड टेव्हरसन असे सर्व स्टारकास्ट दिसणार आहेत.