(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्स चित्रपट ‘सिंघम अगेन’ अखेर बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अनेक अप्रतिम कॅमिओ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ‘सिंघम अगेन’मध्ये रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण आणि अक्षय कुमार देखील कॅमिओ भूमिकेत दिसत आहेत, ‘चुलबुल पांडे’ अर्थात सलमान खानचे नावही या कॉप युनिव्हर्स चित्रपटात सामील झाले आहे. या चित्रपटात चुलबुल पांडेच्या एंट्रीने दिवाळीत खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटगृहात अभिनेत्याच्या एंट्रीने टाळ्यांचा वर्षाव होताना दिसला आहे.
‘चुलबुल पांडे’च्या लूकमध्ये चमकला सलमान खान
‘सिंघम अगेन’ चित्रपटात चुलबुल पांडेची भूमिका करून सलमान खान लोकांचे भरपूर मनोरंजन करताना दिसला आहे. मात्र यावेळी चुलबुल पांडेचा लूक थोडा बदलला आहे. वास्तविक, ‘दबंग’ चित्रपटाव्यतिरिक्त, ‘सिंघम अगेन’मध्ये चुलबुल पांडे मिशा आणि दाढीसह दिसत आहे. चुलबुलचा पांडेचा हा लूक खूप पसंत केला जात आहे, इतकेच नाही तर चित्रपटातील अभिनेत्याच्या एंट्रीवर जोरात शिट्ट्या वाजल्या आहेत. एका यूजरने लिहिले, ‘चुलबुल पांडे परत आला आहे. दिवाळीतीळ सर्वात मोठा धमाका.’ असे लिहून अनेक चाहत्यांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे.
Chulbul Pandey is back.
Biggest aDiwali dhamaka 🔥🔥🔥#SinghamAgain #SalmanKhan
pic.twitter.com/eDTrlzUvIr— Radhe (@RrahulJjoshi) November 1, 2024
हे देखील वाचा – Charuhasan Surgery: दिवाळीच्या सणात कमल हसन यांच्या भावाचा झाला भीषण अपघात, अभिनेता दिवाळी कशी करणार साजरी?
काही लोकांना ‘सिंघम अगेन’मधला सलमान खानचा लूक आवडला आहे, तर काहींना अभिनेत्याचा लूक अजिबात आवडला नाहीये. एका यूजरने लिहिले की, ‘मी या चुलबुल पांडेला ओळखतो, ज्याला मिशी आहे. हा दाढीवाला लुक अजिबात चांगला दिसत नाहीये.’ असे लिहून प्रेक्षकांनी ‘सिंघम अगेन’ मधील चुलबुल पांडेच्या भूमिकेवर आपले मत व्यक्त केले आहे.
सिंघम अगेनची कथा रामायणावर आधारित
‘सिंघम अगेन’ चित्रपटाची कथा ‘रामायण’वर आधारित असून या चित्रपटात अनेक कॅमिओ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ यांच्यासोबत अभिनेता अक्षय कुमारही छोट्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. तसेच चित्रपटगृहात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हे देखील वाचा – Diwali 2024: दिवाळीच्या रोषणाईत चमकले बॉलिवूड सितारे, फोटो शेअर करून चाहत्यांना दिल्या खास शुभेच्छा!
सलमान खानचा आगामी चित्रपट
बॉलीवूड स्टार सलमान खान ‘सिंघम अगेन’च्या कॅमिओ व्यतिरिक्त त्याचा आगामी चित्रपट ‘सिकंदर’ मध्ये दिसणार आहे. जो पुढच्यावर्षी २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. ज्यामध्ये तो नव्या भूमिकेत चाहत्यांच्या समोर येणार आहे. तसेच आता अभिनेता ‘बिग बॉस १८’ चे होस्टिंग करताना प्रेक्षकांना दिसत आहे. अभिनेत्याच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्कंठा लागून राहिली आहे.