(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. बॉलीवूड चित्रपटसृष्टीत सध्या मोठी पार्टी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही प्रियांका चोप्राने परदेशात दिवाळी पार्टी आयोजित केली होती, जे फोटो आता सोशल मीडियावर जास्तच चर्चेत आहेत. चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका लाल साडीत सुंदर दिसत आहे. निक जोनासही कुर्ता पायजमामध्ये खूप हँडसम दिसत आहे. चाहत्यांचे लक्ष या दोघांकडे वेधले गेले आहे. या फोटोंमध्ये प्रियांका चोप्राने लाल रंगाची जाळीदार साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री खूपच आकर्षित दिसत आहे.
हे देखील वाचा – Singham Again: चुलबुल पांडेच्या एंट्रीवर चित्रपटगृहात टाळ्यांचा वर्षाव, चाहते म्हणाले ‘हा एक चमत्कार…’
दिवाळी पार्टीत निक जोनास देखील पांढऱ्या रंगाच्या शेरवानी मध्ये चमकताना दिसला आहे. तसेच हे दोघे पती पत्नीना एकत्र दिवाळी साजरी करताना पाहून चाहत्यांना चांगलाच आनंद झालेला दिसून येत आहे. या फोटोवर त्यांनी कंमेंट करून त्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रियांकाने या जाळीदार साडीसोबत अतिशय स्टायलिश ब्लाउज परिधान केला आहे. प्रियांकाचा हा लूक लोकांना खूप आवडला आहे. त्यामुळे तिचे सौंदर्या आणखी खुलून दिसत आहे. अभिनेत्रीचा या साडीमधील मेकअप देखील साधा आणि आकर्षित आहे.
या फोटोमध्ये प्रियांका पापाराझींना वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसली आहे. फोटोतील प्रियांका चोप्राची ही किलर स्टाईल चाहत्यांना पसंत पडत आहे. तसेच तिच्यासोबाबत तिचा पती निक जोनास देखील पोज देताना दिसला आहे. दोघांची जोड ही चाहत्यांची आवडती जोडी आहे. या लाल साडीसोबत प्रियांकाने सुंदर बांगड्या घातल्या आहेत. फोटोंमध्ये प्रियांका तिच्या सौंदर्याने तिच्या चाहत्यांची मने घायाळ केली आहेत. या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा साडीत तिचे क्लीवेज फ्लाँट करताना दिसत आहे. तसेच चाहत्यांच्या नजरा प्रियांकाच्या स्टायलिश ब्लाउजवरही खेळल्या आहेत. प्रियांका चोप्राने या साडीवर आपले सुंदर केस मोकळे ठेवले आहेत. तसेच या फोटो चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
हे देखील वाचा – अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर आणणार धमाकेदार मेजवाणी, ‘फसक्लास दाभाडे’ चा जबरदस्त पोस्टर रिलीज
कामाच्या आघाडीवर, बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या ‘सिटाडेल’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची तयारी सुरू केली आहे. रुसो ब्रदर्सच्या या सिरीजमध्ये प्रियांका ‘नादिया’च्या भूमिकेत जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहे. ही सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच अभिनेत्रीने बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीमध्येही पदार्पण करून तिचा नुकताच ‘पाणी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रियांका या चित्रपटाची निर्माता आहे.