(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सतत चर्चेत आहे. या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे. समीक्षकांपासून ते प्रेक्षकांपर्यंत अनेक सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण आमिरच्या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. जावेद अख्तर आणि रितेश देशमुख सारख्या स्टार्सनी चित्रपटाचे कौतुक केल्यानंतर आता साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांनीही आमिरच्या चित्रपटाचे कौतुक केले आहे. हा अभिनेता या चित्रपटाबद्दल काय म्हणाला आपण जाणून घेऊयात.
महेश बाबू यांनी शेअर केली पोस्ट
महेश बाबू यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर ‘सितारे जमीन पर’ ची प्रशंसा करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये महेश बाबूंनी आमिरच्या चित्रपटाचे मनापासून कौतुक केले आहे. महेश बाबूंनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘सितारे जमीन पर’ खूप तेजस्वी आणि जबरदस्त आहे. हा चित्रपट तुम्हाला हसवेल, रडवेल आणि टाळ्या वाजवायला भाग पाडेल असा आहे. आमिर खानच्या सर्व क्लासिक चित्रपटांप्रमाणे, तुम्ही या चित्रपटातून तुमच्या चेहऱ्यावर मोठे हास्य घेऊन बाहेर पडाल.’ असे अभिनेत्याने म्हटले आहे.
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतरही करिश्मा कपूरने कर्तव्य पाडले पार, प्रार्थना सभेत झाली भावूक
#SitaareZameenPar …Shines so bright and how…..It’ll make you laugh, cry and clap!! Like all Aamir Khan’s classics, you’ll walk out with a big smile on your face…
Love and Respect..♥️♥️♥️#AamirKhan @geneliad @r_s_prasanna @AKPPL_Official @ShankarEhsanLoy #AmitabhBhattacharya…— Mahesh Babu (@urstrulyMahesh) June 22, 2025
जावेद अख्तरसह अनेक सेलिब्रिटींनी चित्रपटाचे कौतुक केले
महेश बाबूच्या आधीही अनेक सेलिब्रिटींनी ‘सितारे जमीन पर’चे कौतुक केले आहे. एक दिवस आधी, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी आठवड्याच्या शेवटी चित्रपटाच्या चांगल्या कलेक्शनबद्दल आनंद व्यक्त केला आणि आमिर खानचे अभिनंदन केले. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये झालेल्या वाढीबद्दल जावेद अख्तर यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, “दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘सितारे जमीन पर’ने केलेल्या कलेशनबद्दल जाणून मला खूप आनंद झाला आहे. कोण म्हणते की प्रेक्षकांना चांगले चित्रपट आवडत नाहीत? आमिर खान आणि त्याच्या टीमचे अभिनंदन.” यापूर्वी जावेद अख्तर यांनी चित्रपटाचे कौतुक केले आणि म्हटले की ‘सितारे जमीन पर’ हा एक उत्तम चित्रपट आहे, तो पाहिल्यानंतर माझे अश्रू थांबले नाहीत. जावेद अख्तर व्यतिरिक्त, रितेश देशमुख, जुही चावला, काजोल आणि आशुतोष राणा यांसारख्या कलाकारांनीही चित्रपटाचे कौतुक केले आहे.
‘सितारे जमीन पर’ चे कलेक्शन
पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने ६० कोटींचा आकडा ओलांडला आहे. ‘सितारे जमीन पर’ बद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट २० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी मंद सुरुवात झाल्यानंतर, आठवड्याच्या शेवटी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. शनिवारी २०.२ कोटी कमाई करणाऱ्या या चित्रपटाने रविवारी त्याहून अधिक कमाई करून २९.२२ कोटी कमाई केली. यासह, पहिल्या तीन दिवसांतच चित्रपटाचा कलेक्शन ६०.१२ कोटींवर पोहोचला आहे.