(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘एबीसीडी; एनीबडी कॅन डान्स’ या बॉलीवूड चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री लॉरेन गॉटलीबने ११ जून रोजी तिचा दीर्घकाळचा जोडीदार टोबियास जोन्सशी लग्न केले. ही चकीत करणारी बातमी ऐकून चाहत्यांना खूप आनंद झाला. दोघांनी त्यांच्या मित्रमैत्रिणी आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत एका खाजगी समारंभात लग्न केले. लॉरेन गॉटलीबने तिच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अभिनेत्रीच्या लग्नाने लोकांना आश्चर्यचकित केले. आता ती आता पुन्हा मुंबईत परतली आहे. आणि विमानतळावर पापाराझींनी तिला कॅमेरात कॅप्चर केले आहे.
लॉरेन गॉटलीब विमानतळावर नाचताना दिसली
लॉरेन गॉटलीब नुकतीच मुंबईत परतली आहे. ती मुंबई विमानतळावर पापाराझींना दिसली. लॉरेन मुंबई विमानतळावर सुंदर टॉप आणि नेव्ही स्कर्टमध्ये दिसली. यावेळी तिला तिचा आनंद आवरता आला नाही. तिने पापाराझींना तिची चमकणारी अंगठी दाखवली आणि अनेक पोझ दिल्या. तिचे हास्य आणि तिची शैली सांगत होती की ती लग्नाबद्दल खूप उत्साहित आहे. पापाराझींनी तिचे अभिनंदन केले तेव्हा ती आनंदाने उड्या मारत कॅमेरामध्ये हसताना दिसली.
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतरही करिश्मा कपूरने कर्तव्य पाडले पार, प्रार्थना सभेत झाली भावूक
२०२३ मध्ये अभिनेत्रीने केला साखरपुडा
लॉरेन गॉटलीबने २०२३ मध्ये दिग्दर्शक टोबियास जोन्सशी साखरपुडा केला. त्यानंतर, दोघांनीही ११ जून रोजी लग्न केले. लग्नाला फक्त खूप जवळचे लोक उपस्थित होते. लॉरेनला एबीसीडी चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी ओळखले जाते. तिने हिंदुस्तान टाईम्सला तिच्या लग्नाबद्दल सांगितले. तिने या दिवसाचे वर्णन स्वप्न पूर्ण झाल्यासारखे केले.
लग्नाचे फोटो केले शेअर
लग्नाचे फोटो शेअर करताना लॉरेन गॉटलीबने लिहिले, ‘श्री. आणि श्रीमती जोन्स, ११ जून २०२५ रोजी, आम्ही टस्कन टेकडीवर आमच्या मोकळ्या मनाने एकमेकांसोबत राहण्याचे वचन दिले. आम्हाला नेहमीच हे प्रेम जाणवले. आयुष्यात मला मिळालेले हे एकमेव प्रेम आहे. आम्हाला वाटले की आम्ही एकमेकांना शोधल्यानंतर या निर्णयापर्यंत आलो आहोत. आम्ही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस आहे. जणू काही आम्ही स्वप्न पाहत आहोत असे वाटते आहे.’ असे अभिनेत्रीने लिहून ही पोस्ट शेअर केली आहे.
‘Sitaare Zameen Par’ ची तिसऱ्या दिवशी छप्पर फाड कमाई, ‘या’ साऊथ चित्रपटाला जबरदस्त टक्कर
लॉरेन गॉटलीब कोण आहे?
अभिनेत्री लॉरेन गॉटलीब ही एक अमेरिकन नृत्यांगना आणि अभिनेत्री आहे. ती बॉलीवूडमधून भारतात लोकप्रिय झाली. तिने ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’ या चित्रपटातून तिचा प्रवास सुरू केला. नंतर ‘एबीसीडी: एनी बॉडी कॅन डान्स’ या नृत्य चित्रपटात काम केले. ती ‘झलक दिखला जा’ मध्ये देखील अंतिम फेरीत होती आणि नंतर ती जज म्हणून या शो मध्ये दिसली. आता अभिनेत्री तिच्या नुकत्याच नवीन लग्नामुळे चर्चेत आहे.