( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
तमन्नाने बुधवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला. पावसाच्या सरी पाहून ती उत्साहाने बाहेर येते आणि पावसात भिजत आनंद लुटताना दिसते. काही वेळानंतर ती कॅमेऱ्याकडे पाहून हसत म्हणते, “आता मला थंडी वाजत आहे. मी हे फक्त मजेसाठी केलं.” पोस्टच्या कॅप्शनमध्येही तिने लिहिले, “आता मलाही थंडी वाजत आहे.”
या पोस्टवर राशा थडानीने कमेंट करत लिहिले, “तू हे माझ्याशिवाय का केलंस?” राशाची ही कमेंट सोशल मीडियावरही चांगलीच चर्चेत आली आहे. तमन्ना आणि राशा यांच्यातील मैत्री चाहत्यांना माहिती असल्याने त्यांच्या या हलक्या-फुलक्या संवादाला मोठी पसंती मिळत आहे.
सिद्धार्थ मल्होत्रासोबत पहिल्यांदाच झळकणार
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तमन्ना भाटिया लवकरच ‘वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मध्य भारतातील जंगलांच्या पार्श्वभूमीवर आधारित हा लोककथांवर प्रेरित थ्रिलर चित्रपट २८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
व्ही. शांताराम यांच्या बायोपिकमध्येही महत्त्वाची भूमिका
याशिवाय तमन्ना व्ही. शांताराम यांच्या बायोपिकमध्येही झळकणार आहे. या चित्रपटात ती शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी आणि अभिनेत्री जयश्री यांची भूमिका साकारणार आहे. तसेच तिच्या आगामी प्रकल्पांमध्ये ‘रागिणी ३’ या हॉरर ड्रामाचाही समावेश असून, त्यात जुनैद खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार होत आहे.






