(फोटो सौजन्य-Instagram)
बी-टाऊनचे पॉवरफुल कपल म्हणून ओळखले जाणारे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण आता पालक बनले आहेत. आई-वडील झाल्यापासून या जोडप्याचे पूर्ण लक्ष त्यांच्या मुलीवर आहे. आई- वडील झाल्यानंतर रणवीर किंवा दीपिका पदुकोण या दोघांनीही बाळाची झलक दाखवली नाही किंवा तिचे नावही उघड केले नाही. दीपिकाही लाइमलाइटपासून दूर आहे. दुसरीकडे, रणवीर देखील वडील झाल्यानंतर सुमारे 22 दिवसांनी एका कार्यक्रमात सहभागी होताना दिसला आहे.
या कार्यक्रमाला रणवीरने लावली हजेरी
काल संध्याकाळी, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी युनायटेड इन ट्रायम्फ कार्यक्रमाचे आयोजन अँटिलिया येथील त्यांच्या आलिशान घरात केले होते, जे ऑलिम्पियन आणि पॅरालिम्पियन्सच्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात रणवीर सिंगनेही हजेरी लावली, जिथे त्याने पहिल्यांदाच वडील झाल्याचा आनंद व्यक्त देखील व्यक्त करताना दिसला.
रणवीरने वडील झाल्याचा आनंद केला व्यक्त
रणवीर सिंगने काळ्या-पँट सूट आणि शर्ट परिधान केलेल्या स्टायलिश अवतारात कार्यक्रमाला हजेरी लावली. तपकिरी चष्मा आणि लांब केस आणि दाढीने तो खूपच आकर्षित दिसत होता. तथापि, सर्वात जास्त लक्ष वेधले ते त्याचे डोळे, जे वडील बनल्याबद्दल अभिनंदनाने चमकत होते. फोटो क्लिक केल्यानंतर अभिनेत्याने पापाराझींसमोर आपला आनंद व्यक्त केला आणि म्हणाला, “मी बाप झालो आहे”. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनैया व्हिडीओ चाहते प्रचंड प्रतिसाद देत आहेत.
हे देखील वाचा- मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, अभिनेत्याने स्वकष्टाने मिळवले सिनेमासृष्टीत स्थान!
रणवीर सिंगचे आगामी चित्रपट
वैयक्तिक आयुष्यात नवीन सुरुवात केल्यानंतर रणवीर सिंग व्यावसायिक जीवनातही आपल्या करिअरला आणखी उंचीवर नेण्याच्या तयारीत आहे. अभिनेत्याकडे त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये अनेक मोठे चित्रपट आहेत. यापैकी एक ‘सिंघम अगेन’ आहे जो यावर्षी दिवाळीला प्रदर्शित होत आहे. तसेच, फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातही तो दिसणार आहे. चाहते या सगळ्या त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.