(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचली आहे. मालिकेतील समर आणि स्वानंदीच्या प्रवासात नवीन वळण येणार असून, प्रेक्षकांना या भागाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
या भागात आधिरा-रोहन आणि समर-स्वानंदी या दोन जोडप्यांच्या लग्नाची तयारी दिसणार आहे. अनेक अडथळ्यांवर मात केल्यानंतर अखेर दोघांच्या लग्नाचे मांडव सजवले गेले आहेत.या लग्न मांडवात एक नाही तर दोन लग्न होणार आहेत आधिरा-रोहन आणि समर-स्वानंदी. या खास लग्न सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी मालिकेची संपूर्ण टीम गोव्याला दाखल झाली आहे, ज्यामुळे मालिकेच्या कथानकाला एक नवा रंग मिळाला आहे. दक्षिण गोव्याच्या आलिशान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार असून समुद्रकिनाऱ्याच्या मनोहारी वातावरणात ‘बीच वेडिंग’चा थाटमाट पाहायला मिळणार आहे. सजवलेला समुद्रकिनारा, सुंदर फुलांनी नटलेला मंडप आणि कलाकारांचे आकर्षक पोशाख हे या विशेष भागाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
आधिरा आणि रोहन यांच्या प्रेमकहाणीला झालेली सुरुवात जितकी हृदयस्पर्शी आहे, तितकाच समर आणि स्वानंदी यांच्या निर्णयाने मालिकेला एक भावनिक वळण मिळणार आहे. भावंडांच्या प्रेमासाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय पुढे त्यांच्या आयुष्यात काय बदल घडवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. गोव्याला निघण्याआधी मुंबईत मुहूर्तमेढ आणि स्वानंदीचा खास मेहंदी सोहळा पार पडला. या आनंदात रोहन आणि संपूर्ण कुटुंब उत्साहाने सहभागी झाले. सर्वजण हसत-खेळत आणि गोड गप्पा मारत हे क्षण साजरे करत होते. सोहळ्यातील उत्साह आणि आनंदाची ऊर्जा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
‘Chhaava’ चा लवकरच तुटणार रेकॉर्ड, ‘Kantara Chapter 1’ चा धुमाकूळ; रविवारी एवढ्या कोटींचे कलेक्शन






