Hyundai Venue ची नवीन जनरेशन तुमच्यासाठी किती सुरक्षित असेल?
भारतीय ऑटो बाजारात एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक कार्स उपलब्ध आहेत. यातही काही एसयूव्ही अशा आहेत, ज्यांच्या विक्रीत नेहमीच वाढ होताना दिसते. अशीच एक लोकप्रिय Hyundai Venue. भारतीय बाजारपेठेत ह्युंदाई अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. कंपनी लवकरच कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवीन जनरेशनची व्हेन्यू लाँच करणार आहे. चला या एसयूव्हीच्या सेफ्टी फीचर्स, लाँच तारीख आणि अपेक्षित किंमत याबद्दल जाणून घेऊयात.
ह्युंदाई कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये सादर केलेली नवीन जनरेशनची व्हेन्यू भारतीय बाजारात लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने यापूर्वी या एसयूव्हीची अनेक फीचर्स उघड केली आहेत. आता, त्याचे सेफ्टी फीचर्सबाबत सुद्धा माहिती देण्यात आली आहे.
ह्युंदाईकडून मिळालेल्या माहितीनुसार, नव्या एसयूव्हीमध्ये सेफ्टीसाठी अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. या एसयूव्हीमध्ये Level-2 ADAS, हाय दर्जाचे स्टील बॉडी, 6 एअरबॅग, ESC, HAC, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, SVM, सर्व चाकांमध्ये डिस्क ब्रेक, TPMS, ESM, थ्री-पॉइंट सीट बेल्ट, रोलओव्हर सेन्सर अशा 33 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्ससोबतच एकूण 65 पेक्षा अधिक सेफ्टी फीचर्स उपलब्ध असतील.
सुरक्षेसोबतच, या एसयूव्हीच्या इतर फीचर्सची माहितीही निर्माता कंपनीने आधीच दिली आहे. यात 12.3-इंचांच्या दोन स्क्रीन, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस Android Auto, Apple CarPlay, सनरूफ, OTA अपडेट, LED DRL, LED लाइट्स, आणि कनेक्टेड टेललाइट्स असे अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.
71.33 KM मायलेज देणाऱ्या ‘या’ Hybrid Scooter वर ग्राहक तुटून पडलेत, किंमत फक्त…
कंपनीने पुष्टी केली आहे की, हे नवी जनरेशन Hyundai Venue भारतात 4 नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे लाँच केली जाईल. याच्या किमतीतही थोडासा बदल अपेक्षित आहे.
नवी Hyundai Venue ही कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये सादर केली जाणार असून, याची थेट स्पर्धा Maruti Brezza, Kia Sonet, Mahindra XUV 3XO, Kia Syros, आणि Tata Nexon यांसारख्या लोकप्रिय SUV मॉडेल्सशी होईल.






