(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
राजकुमार राव यांची गणना बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांमध्ये केली जात आहे. विनोदी चित्रपटांतून त्याने आपली प्रतिभा दाखवली आहे. नुकताच अभिनेत्याचा ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या कथेसोबतच अभिनेत्याची पंचलाईनही खूप पसंत केली जात आहे. त्यामुळेच चित्रपटाच्या क्लॅशनंतरही या चित्रपटाला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज शांडिल्याच्या दिग्दर्शनात बनलेला, ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ मध्ये विकी (राजकुमार राव) आणि विद्या (तृप्ती डिमरी) यांची कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्यांच्या लग्नाची सीडी कुठेतरी हरवली आहे. इथूनच संपूर्ण चित्रपटाची कथा सुरू होते, त्यानंतर चित्रपट एक विनोदी वळण घेतो, एकामागून एक ट्विस्टने भरलेला हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आहे.
क्लॅशनंतरही चित्रपगृहात केली धकामेदार कमाई
आलिया भट्टच्या ‘जिगरा’सोबतचा ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ रिलीज झाला आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवलेल्या आलियाच्या चित्रपटाला ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ ने यश मिळवून दिले आहे. पहिल्या दिवसापासून राजकुमार रावचा चित्रपट आलिया भट्टच्या चित्रपटापेक्षा चांगली कमाई करत आहे. रिलीजच्या पहिल्या सोमवारीही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
हे देखील वाचा- आमिर खान लवकरच करणार ‘गजनी २’ची घोषणा, चित्रपटासाठी या दिग्दर्शकासोबत केली हातमिळवणी!
‘विकी विद्या…’ चित्रपटाची कमाई
पहिल्या दिवशी | 5.71 कोटी |
---|---|
दुसऱ्या दिवशी | 7.06 कोटी |
तिसऱ्या दिवशी | 6.40 कोटी |
चौथ्या दिवशी | 2.33 कोटी |
एकूण | 21.5 कोटी |