मुंबई : हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येमुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टी हादरून गेली आहे. तुनिशाने आत्महत्येसारखे मोठे पाऊल का उचलले? आत्महत्येपूर्वी नक्की काय घडले होते? याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. तुनिशाचा मित्र शिजान याला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांचे मोबाईल फोन देखील याप्रकरणात मोठे रहस्य उलगडू शकतात म्हणून पोलिसांनी या दोघांचे फोन ताब्यात घेतले आहेत.
आत्महत्येपूर्वी शीजान सोबत होती तुनिशा
वसई पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार तुनिशा शनिवारी सकाळी आपल्या घरून मालिकेच्या सेटवर जाताना अतिशय आनंदित होती. पहिली शिफ्ट संपल्यानंतर ती सहकलाकार असलेल्या शीजान सोबत दुपारी तीन वाजता मेकअप रूममध्ये जेवत होती. पोलिसांना शंका आहे की ३ वाजून १५ मिनिटांनी तुनिशाने आत्महत्या केली असावी.
तुनिशा आणि शीजान यांच्या फोनची करणार तपासणी
पोलिसांनी तुनिशा आणि शिजान या दोघांच्या फोनची तपासणी करण्याकरता लॅब मध्ये पाठवले आहेत. यातून दोघांनी एकमेकांना किती आणि कधी कॉल केले, यात त्यांचे काय संभाषण झाले, तसेच व्हाट्सअँप चॅट इत्यादी गोष्टी पहिल्या जाणार आहेत. तसेच ब्रेकअपनंतर १५ दिवस यादोगाह्णमध्ये काय संभाषण झाले यावरही पोलीस तपास करणार आहेत.