(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सोनी लिव्हने आगामी थ्रिलर ‘कानखजुरा’चा टीझर लाँच केला आहे. ही सिरीज गोव्याच्या शांतमय वातावरणामध्ये स्थित भयावह कथा आहे. या मालिकेमध्ये दिसणाऱ्या गोष्टी खूपच धोकादायक असणार आहेत. या टीझरमध्ये भयावह विश्वाची झलक पाहायला मिळते आहे, जेथे गुन्हेगारी कायम राहते, सिक्रेट्स गुपित राहतात आणि अनेक रहस्य तिथे उघड होणार आहेत. समीक्षकांनी प्रशंसित केलेली इस्रायली सिरीज ‘मॅग्पी’चे हिंदी रूपांतरण असलेली सिरीज ‘कानखजुरा’ मूळ कथानकाला भारतीय व्हर्जनमध्ये आणि प्रखर भावनिकतेसह सादर करणार आहे.
R Madhavan चं NCERT च्या अभ्यासक्रमावर केले प्रश्नचिन्ह उपस्थित, हिंदू-बौद्ध धर्मावरही केले भाष्य…
‘कानखजुरा’ या मालिकेमध्ये दोन विभक्त झालेल्या भावंडांना गडद भूतकाळाचा सामना करण्यास भाग पाडले जाते, जेथे ते जुन्या आठवणी आणि वास्तविकतेमधील संबंध शोधण्याचा प्रयत्न करतात. स्वत:च्या जुन्या आठवणींमुळे तुम्ही कधीच सुटका न होऊ शकणाऱ्या जाळ्यामध्ये अडकल्यास काय घडते हे सगळं या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
या मालिकेबद्दल आशूची भूमिका साकारणारा रोशन मॅथ्यू म्हणाला, ”सिरीज ‘कानखजुरा’ने माझे लक्ष वेधून घेतले, ज्यासाठी कारण म्हणजे कथानकामधील भावनिक प्रखरता आणि गोंधळादरम्यानची शांतता या मालिकेत दिसणार आहे. आशूची भूमिका लक्षवेधी आहे. जो क्षणोक्षणी भावूक होतो, पण त्याच्या शांत स्वभावापलीकडे मोठे वादळ लपलेले आहे. कथानक हृदयस्पर्शी आणि भयानक आहे. सिरीजमधील प्रत्येक नातेसंबंधामध्ये काही-ना-काही गुपित आहे आणि पात्रं याच गुपितांसह पुढे जातात, ज्यामुळे ही सिरीज अत्यंत धमाल आणि रोमांचक आहे.”
अजय राय यांची निर्मिती आणि चंदन अरोरा दिग्दर्शित सिरीज ‘कानखजुरा’मध्ये प्रतिभावान कलाकार आहेत, जसे मोहित रैना, रोशन मॅथ्यू, साराह जेन डायस, महेश शेट्टी, निनाद कामत, त्रिनेत्र हल्दर, हीबा शाह आणि उषा नाडकर्णी हे सगळे कलाकार पाहायला मिळणार आहेत. प्रख्यात इस्रायली सिरीज ‘मॅग्पी’वर आधारित ही सिरीज येस स्टुडिओजच्या परवान्यांतर्गत क्रिएटर्स आदम बिझान्स्की, ओमरी शेनहार आणि डाना एडेन यांच्याद्वारे हिंदी रुपांतरित करण्यात आली आहे. डोना आणि शुला प्रॉडक्शन्सद्वारे निर्मित ही मालिका आहे. या सिरीजचे कथानक विभक्त झालेली कुटुंबं, विश्वासघात आणि दोष आणि जगण्यामधील लहान, भावूक क्षणांचा शोध घेते. ‘कनखजुरा’ ही मालिका ३० मे पासून फक्त सोनी लिव्हवर दाखवण्यात येणार आहे.