गोविंदा आणि डेव्हिड धवनने एकत्र काम करणं का बंद केलं? सुनीता अहुजाने केला खुलासा
Sunita Ahuja On Govinda David Dhawan Fight: ‘बीबी नंबर १’, ‘क्यों कि मैं झूठ नहीं बोलता’, ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर १’ आणि ‘हिरो नंबर १’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन डेव्हिड धवन आहे. डेव्हिड धवन यांच्या अनेक सुपर डुपर हिट चित्रपटांमध्ये अभिनेता गोविंदाने ९० च्या दशकात काम केले आहे. अनेक सुपर डुपर हिट चित्रपट देणाऱ्या डेव्हिड धवन आणि गोविंदा ह्या जोडीने अचानक एकत्र चित्रपटांमध्ये काम करणं का बंद केलं ? या प्रश्नाचं उत्तर गेल्या अनेक वर्षांपासून फक्त चाहत्यांनाच नाही तर अख्ख्या बॉलिवूड इंडस्ट्रीला सुद्धा मिळालेलं नाही. आता या प्रश्नाचं उत्तर गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने दिलेलं आहे.
‘टाईम आऊट विथ अंकित ’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाची पत्नी सुनीत आहुजाने हा खुलासा केला. अनेक सुपर डुपर हिट चित्रपट देणाऱ्या डेव्हिड धवन आणि गोविंदा ह्या जोडीने अचानक एकत्र चित्रपटांमध्ये काम करणं का बंद केलं ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सुनीता म्हणाल्या, “माझ्या मते, सेलिब्रिटींनी काही ठराविक काळासाठी हिरो म्हणून राहावं. तुम्ही ९०च्या दशकातले कलाकार असाल; पण आजच्या काळातही जर मुख्य भूमिका करायच्या असतील, तर ते शक्य नाही. कदाचित, डेव्हिड गोविंदाला बोलले असतील की, अमितजी (अमिताभ बच्चन), अक्षय कुमार सारखे हे सर्व कलाकार सेकंड लीड रोल करतात. तर तू पण कर, असा कदाचित त्यांनी गोविंदला सल्ला दिला असावा. त्यामुळे त्यांच्यात मतभेद निर्माण झाले असावे.”
“त्या काळी गोविंदाच्या आजूबाजूला त्याचे काही चमचे लोकं होते. जे त्याला सांगायचे की, तू लीड अभिनेत्याची भूमिका साकार. पण माझ्या मते ते तसे चालत नाही. आपण ट्रेंडसोबतच पुढे जायला हवं. गोविंदाला बहुधा सेकंड लीड भूमिका साकारणं आवडलं नसावं. कारण त्याने नव्वदच्या दशकात डेव्हिडसोबत फक्त सोलो हिट्स (एकेरी भूमिका) दिल्या होत्या. म्हणून, गोविंदाला सेकंड लीड भूमिका करणं योग्य ठरणार नाही. यावरून दोघांमध्ये मतभेद झाले असावेत. माझ्या मते, डेव्हिड चुकीचा नव्हता आणि गोविंदाही त्याच्या जागी बरोबर होता.”
सुनीता पुढे मुलगा यशवर्धन आहुजाबद्दल बोलली. “गेल्या काही वर्षांपासून यश अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. सुनीताने त्याच्या अपकमिंग प्रोजेक्टबद्दल खुलासा केला नाही. यश सध्या अभिनयाचं शिक्षण आहे. तो बॉलिवूडमध्ये कदाचित 2025 च्या सुरुवातीला दिसेलं असंही सुनीताने मुलाखतीत सांगितलं. जानेवारी २०२३ मध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये यशच्या डेब्यूबद्दल अनेक बातम्या पब्लिश केल्या होत्या. त्यानुसार, यशचा पहिला चित्रपट ‘आओ ट्विस्ट करे’ हा असण्याची शक्यता आहे. गोविंदा स्वतः त्याची निर्मिती करत आहे. यशसोबतच कोरिओग्राफर गणेश आचार्यची मुलगी सौंदर्याही पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.