‘सनम बेवफा’, ‘सौतन’ यांसारख्या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माता, लेखक आणि गीतकार सावन कुमार टाक यांचं आज निधन (Saawan Kumar Tak Passed Away) झालं आहे. मुंबईतील (Mumbai) कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आज संध्याकाळी साधारण ४.१५ च्या आसपास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराचा झटका आल्याने आणि अनेक अवयव निकामी पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
[read_also content=”आता सगळेच पन्नास खोके…एकदम ओके…म्हणायला लागलीयेत, भास्कर जाधव यांची शिंदे गटातील आमदारांवर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/bhaskar-jadhav-on-shinde-group-mla-on-khoke-319369.html”]
चार दशकांच्या कारकिर्दीत सावन कुमार टाक यांनी संजीव कुमार ते सलमान खानपर्यंतच्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. ते अनेक चित्रपटांचे निर्माता, दिग्दर्शक, गीतकार आणि लेखक होते. सावनकुमार टाक हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते.
सावन कुमार टाक यांना काही दिवसांपासून फुफ्फुसाचा आजार होता, त्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आयसीयूमध्ये दाखल असलेल्या सावन कुमारचे हृदयही व्यवस्थित काम करत नव्हते. याशिवाय त्यांना इतरही अनेक आजार होते.