सूरज चव्हाणच्या 'झापूक झुपूक' चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, दिग्दर्शकांसह अख्ख्या स्टारकास्टचा फोटो पाहिलात का?
‘बिग बॉस मराठी ५’ फेम सूरज चव्हाण नेहमीच चर्चेतील नाव आहे. सूरजने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर स्वत:चे नाव कोरल्यानंतर त्याच्या प्रसिद्धीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ‘बिग बॉस मराठी ५’च्या ग्रँड फिनालेच्या दिवशी बिग बॉस मराठीचा विजेता जाहीर करण्याच्या काही वेळापूर्वीच दिग्दर्शक केदार शिंदेंनी सूरज चव्हाणसोबतच्या ‘झापूक झुपूक’ चित्रपटाची घोषणा केली होती. केदार शिंदे मराठी फिल्म इंडस्ट्रीचे लोकप्रिय दिग्दर्शक असून कलर्स चॅनलचे ते प्रोगोमिंग हेड देखील आहेत. त्यांनी सूरजला घेऊन ‘झापुक झुपूक’ नावाचा चित्रपट करणार अशी घोषणाही केली होती. आता प्रत्यक्षरित्या या चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाली आहे. नुकतंच सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला आहे.
ऐश्वर्या रायने‘जोधा अकबर’मध्ये परिधान केलेला लेहेंगा ऑस्करमध्ये, नेमकं कारण काय ?
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री दीपाली पानसरेने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘झापुक झुपूक’ चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत दीपाली पानसरेने लिहिलं की, “जे ठरवलं होतं ते सत्यात उतरलं. मी गेल्या कित्येक दिवसांपासून केदार शिंदेंबरोबर काम करण्याची वाट पाहत होते. अखेर तो क्षण आलाच. केदार शिंदे आणि बेला शिंदे तुमचे खूप खूप धन्यवाद. ‘झापुक झुपूक’ टीमला शुभेच्छा.” अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मराठी मालिकेंतले अनेक कलाकार पाहायला मिळत आहे. यामध्ये बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाण, ‘पिरतीचा वनवा उरली पेटला’ मालिकेतील इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, ‘अबीर गुलाल’ मालिकेतील पायल जाधव, ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे झळकणार आहेत.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे, बेला शिंदे निर्मित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी २०२५ मध्ये चित्रपट रिलीज होणार अशी माहिती दिली होती. पण, या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना आतापासूनच कमालीची उत्सुकता आहे. दीपालीच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. “अभिनंदन…चित्रपट कधी येणार”, “जबरदस्त”, “या नव्या चित्रपटासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
‘अल्लू अर्जुनचे चित्रपट राज्यात चालू देणार नाही’; आमदार भूपती रेड्डी यांचा अभिनेत्यावर निशाणा!