सरकारी नोकरीच्या नावे ४० लाखांची फसवणूक (फोटो- सोशल मिडिया)
चिपळूण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
सरकारी नोकरीच्या नावे ४० लाखांची फसवणूक
नागरिकांना केले सतर्कतेचे आवाहन
चिपळूण: सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार चिपळूण तालुक्यातील खेडी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीने डिसेंबर २०२२ ते में २०२४ या कालावधीत तब्बल ४० लाख ८५ हजार ५८४ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात महेश भास्कर महात्रे (रा. मु.पो. जित, ता. पेण, जि. रायगड) याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४२०, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्याची नितीन श्रीकांत (वय ४०) व्यवसाय शेती, रा. मु.पो. बुरंबड, बाचा बठार, शेवरकडी, ता. संगमेश्वर यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी महेश महात्रे याने स्वतःची ओळख प्रभावशाली व्यक्ती महणून करून देत साकारी खात्यात नोकरी लावून देतो असे खोटे आरवासन दिले. या आमिषाने फिर्यादी रसाळ यांच्याकडून ६पये तसेच इतर सात जणांकडून मिळून एकूण १८ लाख २५ हजार रुपये स्वीकारले.
हेही वाचा: 8th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; आठवा वेतन आयोग आजपासून होणार लागू
ई-चलन लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन
फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), वाहन नोंदणी, ई-चलन यांसारख्या सेवासंबंधित बनावट संकेतस्थळ, फसवे मोबाईल अॅप्स (एपीकेएस) तसेच मोबाईल एसएमएस, व्हॉटस्अॅपद्वारे खोट्या लिंक्स पाठवून नागरिकांची फसवणूक होत आहे, वाहन चालक, मालकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे, त्यामुळे नागरिकांनी बनावट संकेतस्थळ, अॅप्स आणि ई-चालान बनावट लिंक्सपासून सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आणि फक्त अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा असे आवाहन परिवहन विभागाकडून देण्यात आले आहे.
फसवणूक करणारे मोबाईल एसएमएस किंवा व्हॉट्सअँप संदेशांद्वारे ‘चलन बाकी आहे’, ‘परवाना सस्पेंड होणार आहे’ अशा संदेशांसह अनधिकृत पेमेंट लिंक पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच RTO Services apk, mPar-ivahan Update.apk, eChallan Pay.apk अशी अनाधिकृत एपीके अॅप्स डाऊनलोड केल्यास मोबाईल तसेच इतर संवेदनशील माहिती चोरी होण्याचा धोका आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






