ऐश्वर्या रायने‘जोधा अकबर’मध्ये परिधान केलेला लेहेंगा ऑस्करमध्ये, नेमकं कारण काय ?
दिग्दर्शक आणि निर्माता आशुतोष गोवारीकर यांचा ‘जोधा अकबर’चित्रपट (Jodha Akbar) २००८ मध्ये कमालीचा सुपरहिट ठरला होता. यामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) होते. चित्रपटापेक्षा प्रेक्षकांना त्यातील ऐश्वर्या राय बच्चनचा लूक आणि दागिने आवडले होते. ऐश्वर्याच्या महिला चाहत्यांना तिचा हा लूक इतका आवडला की लग्न करणाऱ्या तरुणींमध्ये ‘जोधा अकबर’ चित्रपटातील लूकची आणि दागिन्यांची प्रचंड क्रेझ दिसत होती.
‘जोधा अकबर’मधील ऐश्वर्या रायच्या लग्नातील लेहेंग्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळणार आहे. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने हा लेहेंगा संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवला आहे. ऐश्वर्या रायने ‘जोधा अकबर’मध्ये तिच्या लग्नात घातलेला लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाइन केला होता. नीता लुल्लाचा हा लेहेंगा एक उत्कृष्ट नमुना आहे, जो आता संपूर्ण जग पाहणार आहे. ऑस्कर म्युझियमने हा लेहेंगा आपल्या आगामी प्रदर्शनासाठी ठेवला आहे. ‘जोधा अकबर’मधील लेहंग्याच्या डिझाइनपासून ते दागदागिन्यांपर्यंत सर्व गोष्टींची बाजारात त्या काळात प्रचंड मागणी होती. यामध्ये खऱ्या सोन्याच्या दागिन्यांपासून ते बनावट दागिन्यांचेही महिलांसाठी पर्याय उपलब्ध होता.
ऐश्वर्या रायच्या लेहेंग्याबद्दल बोलायचे झाले तर, लेहेंग्यात उत्कृष्ट जरदोसीचे काम करण्यात आले आहे, जे जुन्या काळातील तंत्र दाखवते. त्याचबरोबर ऐश्वर्या रायने परिधान केलेल्या जड नेकलेसवर निळा मोर आहे, ज्यावर कुंदन वर्क करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ही रचना खूपच सुंदर असून अतिशय आकर्षक आहे. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने यासंदर्भात एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये डेमो लेहेंगा घातला आहे. या व्हिडिओमध्ये ‘जोधा अकबर’चे काही सीन्स देखील आहेत, ज्यामध्ये हृतिक रोशन अकबरच्या भूमिकेत दिसत आहे. तर ऐश्वर्या रायही दिसत आहे.
‘पुष्पा २’च्या वादग्रस्त घडामोडीनंतर दिग्दर्शकांचा धक्कादायक निर्णय, सुकुमार नेमकं काय म्हणाले ?
व्हिडिओ शेअर करताना, अकादमीने लिहिले की, “एका चित्रपटासाठी डिझाइन केलेला लेहेंगा राणीसाठी खूप छान दिसत आहे. जोधा अकबर (2008) मधील ऐश्वर्या रायच्या लग्नातील हा लाल रंगाचा लेहेंगा अजूनही लोकांना आवडतो. त्याची सुंदर जरदोसी भरतकाम एक जुनी कला आपल्या दाखवते. शिवाय, दागिन्यांची उत्कृष्ट गुणवत्ताही ती आपल्याला दर्शवते. जेव्हा तुम्ही याकडे बारकाईने पाहाल तेव्हा तुम्हाला त्यात कोरलेला एक मोरही दिसेल, जो भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. हे पूर्णपणे हिरे आणि रत्नांनी बनलेले आहे. नीता लुल्ला यांनी केवळ पोशाखच डिझाइन केला नाही, तर तो भारताच्या वारशाचे प्रतीक आहे.”
१५ इतिहासकार, तब्बल २५ लेखक अन् नेहरूंचं पुस्तक; श्याम बेनेगल यांनी असा बनवला ‘भारत एक खोज’टीव्ही शो
जोधा अकबर चित्रपटाबद्दल सांगायचे तर, हृतिक रोशनने चित्रपटात मुघल सम्राट अकबर आणि ऐश्वर्या राय बच्चनने राजकुमारी जोधाची भूमिका साकारली होती. या सिनेमामध्ये सोनू सूद, कुलभूषण खरबंदा आणि इला अरुण यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या सिनेमाला दोन राष्ट्रीय पुरस्कार (National Award)देखील मिळाले आहेत. या सिनेमातील ‘अज़ीम-ओ-शान शहंशाह’, ‘जश्न-ए-बहारा’, ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ आणि ‘लम्हों के दामन’, ही गाणी देखील प्रचंड हिट ठरली होती.